Home /News /national /

विषारी सापाला तो डीजेच्या तालावर नाचवत होता, आणि एका क्षणात सगळंच गेलं बदलून

विषारी सापाला तो डीजेच्या तालावर नाचवत होता, आणि एका क्षणात सगळंच गेलं बदलून

गाण्यांच्या तालावर तो साप नाचवत होता. लोक टाळ्या वाजवत होते. मात्र एका क्षणात सापाने झेप घेत शंभूच्या पाठीवर दंश केला.

    खगडिया 03 सप्टेंबर: बिहारमधल्या खगडिया जिल्ह्यात विषारी सापाला आपल्या तालावर नाचवणं एका व्यक्तीला जीवावर बेतलं. एका स्थानिक यात्रेत लोकांसमोर विषारी सापाचा खेळ सुरू होता. लोक टाळ्या वाजवत होते. मात्र एका क्षणात सापाने त्याला दंश केला. त्यानंतरही तो अर्धा तास खेळ करतच राहिला मात्र नंतर तो बेशुद्ध झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचं वातावरण बदलून यात्रेवर दु:खाचं सावट निर्माण झालं. खगडिया जिल्ह्यातल्या बेलदौर भागातल्या पनसला गावातली ही घटना आहे. इथे एक यात्रा सुरु होती. मूर्तीच्या विसर्जन विरवणुकीत शंभू सिंह हा जहाल असा कोब्रा नाग घेऊन सहभागी झाला. शंभू हा निष्णात साप पकडणारा असल्याने त्याचं कुणाला फारसं काही वाटलं नाही. गाण्यांच्या तालावर तो साप नाचवत होता. लोक टाळ्या वाजवत होते. मात्र एका क्षणात सापाने झेप घेत शंभूच्या पाठीवर दंश केला. मात्र त्याच्यावर लगेच काही परिणाम झाला नाही. त्यानंतरही तो अर्धा तास सापाला खेळवत होता. Covid-19: महाराष्ट्रासाठी Good News, Active रुग्णांच्या संख्येत झाली घट! मात्र नंतर बेशुद्ध होऊन खाली पडला तो पुन्हा उठलाच नाही. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आनंद यात्रेचं रुपांतर शोक सभेत झालं. शंबू सिंह यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. याआधीही त्याने अनेक विषारी सापांना हाताळलं असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. शंभू या सापांना हाताळण्यात तरबेज असल्याने त्याला फार कुणी काही सांगत नव्हतं. त्यामुळे तो सहजगत्या सापांना पकडत असे. मात्र हीच बफिकरी त्याच्या जीवावर बेतली. या घटनेने सर्व गावच हादरून गेले असून लोक हळहळ व्यक्त करत आहेत. सॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी! या गावात आणि परिसरात कुठेही साप निघाला की लोक शंभू सिंहला बोलवत असत. आता आम्ही कुणाला बोलवायचं असा सवाल या लोकांनी केलाय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Snake

    पुढील बातम्या