मॅट्रिमोनियल साइटवर ओळख वाढवून तरुणीची केली फसवणूक, बलात्काराचाही आरोप

मॅट्रिमोनियल साइटवर ओळख वाढवून तरुणीची केली फसवणूक, बलात्काराचाही आरोप

लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर रजिस्टर करत असाल तर सावध राहा. अशा साइटवर जीवनाचा साथीदार शोधताना एका मुलीला मोठ्या फसवणुकीला सामोरं जावं लागलं. तिने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा तर तिला पोलिसांचाही विचित्र अनुभव आला.

  • Share this:

दिल्ली, 1 ऑगस्ट : लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर रजिस्टर करत असाल तर सावध राहा. अशा साइटवर जीवनाचा साथीदार शोधताना एका मुलीला मोठ्या फसवणुकीला सामोरं जावं लागलं. तिने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा तर तिला पोलिसांचाही विचित्र अनुभव आला.

दिल्लीमध्ये राहणाऱ्या राहुल चौहानने एका खाजगी बँकेत काम करणाऱ्या मुलीशी मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख वाढवली. त्याने तिला लग्नाचं आश्वासनही दिलं. या तरुणीने त्याच्या बोलण्याला भुलून त्याला आपला इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड दिला. या पासवर्डने या तरुणाने बरीच खरेदी केली आणि हे पैसे आईच्या औषधोपचारांसाठी वापरतोय, अशी बतावणी केली.

'शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांसोबतच', अमोल कोल्हेंसह कार्यकर्त्यांची शपथ

राहुल चौहान नावाच्या या इसमाने या तरुणीच्या बँक खात्यातले 10 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात या तरुणीला त्याने दिल्लीला बोलवलं. इथे त्याने आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार या तरुणीने केली आहे. याबद्दल तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

पोलिसांनी या राहुल चौहान या इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पण या प्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांनी सगळे पुरावे कोर्टात सादर केले नाहीत, असं समोर आलं. याविरोधात या तरुणीने पुन्हा एकदा हायकोर्टात दाद मागितली. पोलीस या प्रकरणात आरोपीला वाचवत आहेत, तसंच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करत आहेत, असा आरोप या तरुणीने केला. या याचिकेवरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने पोलिसांना या तरुणीने दिलेली सगळी कागदपत्रं कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

====================================================================================

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या