मुस्लीम डिलीव्हरी बॉयने जेवण आणलं म्हणून कॅन्सल केली ऑर्डर, zomato ने दिलं चोख उत्तर

मुस्लीम डिलीव्हरी बॉयने जेवण आणलं म्हणून कॅन्सल केली ऑर्डर, zomato ने दिलं चोख उत्तर

Zomato ही ऑनलाईन फूड ऑर्डर करणारी वेबसाईट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जुलै: Zomato ही ऑनलाईन फूड ऑर्डर करणारी वेबसाईट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी Zomato त्यांनी दिलेल्या जेवणामुळे नाही तर डिलिव्हरी बॉयमुळे चर्चेत आली आहे. एका व्यक्तीने Zomatoवरून ऑर्डर दिली होती. पण जेव्हा त्याला मेसेजच्या माध्यमातून कळाले की जो व्यक्ती जेवण घेऊन येणार आहे ती मुस्लीम आहे तर संबंधित ग्राहकाने ऑर्डरच कॅन्सल केली.

अमित शुक्ल नावाच्या या व्यक्तीने Zomato जेवणाची ऑर्डर दिली होती. पण जेव्हा त्याला कळाले की ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती मुस्लीम आहे. यावर त्याने Zomatoला डिलीव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. या गोष्टीला Zomatoने नकार दिल्याने अमितने ऑर्डरच रद्द केली आणि जेवणाचे पैसे परत करण्यास सांगितले. Zomato पैसे देण्यास नकार दिल्याने ग्राहक आणि कंपनी या दोघांच्यात सोशल मीडियावर वाद सुरू झाला.

यासंदर्भात अमित शुक्लाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील टाकली आहे. मी आताच Zomatoवर दिलेली एक ऑर्डर रद्द केली. कारण ते एका गैरहिंदू माझे जेवण पाठवत होते. मी डिलीव्हरी बॉय बदलण्यास सांगिल्यानंतर ही ते तयार झाले नाहीत. ते (Zomato)मला अशा पद्धतीने जेवण घेण्यास दबाव टाकू शकत नाहीत आणि मला पैसे परत करण्याची देखील गरज नाही.

अमितने याचा एक स्क्रीन शॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात दिसत आहे की फैयाज नावाचा डिलीव्हरी बॉय अमितच्या घरी जेवण पोहोचवणार होता. याची माहिती कळताच त्याने Zomatoला डिलीव्हरी बॉय बदलण्यास सांगितले. Zomatoसोबत झालेल्या वादाच्या स्क्रीन शॉटमध्ये अमितने असे देखील म्हटले आहे की, सध्या श्रावण सुरु आहे आणि मुस्लिम व्यक्तीकडून डिलिव्हरीची गरज नाही.

या सर्व वादावर Zomatoने स्पष्ट केले की अन्नाला धर्म असत नाही. त्याच बरोबर असा पद्धतीने जर ऑर्डर रद्द केली तर त्यासाठी दंड म्हणून 237 रुपये द्यावे लागतील. अमितने अशी देखील तक्रार केली आहे की, मी विरोध केल्यामुळे Zomatoने ब्लॉक केले आणि अॅपवर ऑर्डरची माहिती देखील दिसत नाही.

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading