मराठी बातम्या /बातम्या /देश /

सोशल मीडियावर पोस्ट केला पत्नीचा आक्षेपार्ह PHOTO, पतीविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर पोस्ट केला पत्नीचा आक्षेपार्ह PHOTO, पतीविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर (Social Media) पत्नीचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) पत्नीचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) पत्नीचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • Published by:  Shreyas

भोपाळ, 12 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (Social Media) पत्नीचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी पतीविरोधात हबीबगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला शासकीय विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत असून सध्या आरे कॉलनीमध्ये राहते. जबलपूरमध्ये राहणाऱ्या या महिलेचे 2015 मध्ये लग्न झाले, पण लग्नाच्या काही वर्षांतच पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा आला.

पतीविरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये महिलेने असे म्हटले की, लग्न ठरवताना तिच्या सासऱ्यांनी पतीच्या नोकरीबद्दल खोटे सांगितले होते. 34 वर्षांचा तिचा पती बेरोजगार होता, लग्नानंतर आपल्याला ही माहिती कळाली. याबद्दल सासरच्यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी मला छळायला सुरूवात केली. तसंच पती त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची जबरदस्ती करू लागला, असे आरोप या महिलेने केले आहेत.

काही महिन्यापूर्वी महिलेला भोपाळमध्ये नोकरी मिळाली. नोकरीसाठी भोपाळला जाण्यापूर्वी ती आपल्या पतीसोबतच राहत होती. पत्नी नोकरीसाठी बाहेर गेल्यामुळे तिचा पती संतप्त झाला. त्याने काही दिवसांपूर्वी पत्नीचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, तसंच त्याने अश्लिल स्टेटससह पत्नीलाही यात टॅग केलं. हे पाहून महिलेला धक्का बसला.

पतीने केलेल्या कृत्याबाबत महिलेला माहिती मिळाली तेव्हा तिने आपल्या पतीसोबत याबद्दल चर्चा केली. मात्र त्याने तिला दुसऱ्या महिलेसोबत लग्न करत असल्याचे सांगून सोडण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. हबीबगंज पोलिस स्टेशनच्या सब इनस्पेक्टर सुनीता भालेराव यांनी सांगितले की, 'आरोपी जबलपूरमध्येच राहतो. त्याच्याविरोधात आयपीसी कलम 494, 509 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: