ऐकावं ते नवलच! नवरा रोज 7 तास अंघोळ करतो म्हणून बायकोनं दिला घटस्फोट

ऐकावं ते नवलच! नवरा रोज 7 तास अंघोळ करतो म्हणून बायकोनं दिला घटस्फोट

जास्त वेळ आंघोळ करण्यासाठी घालवत असाल तर ही बातमी एकदा वाचा.

  • Share this:

बंगळुरू, 12 जानेवारी : सामान्य लोकांना अंघोळीसाठी फार फार तर अर्ध्या तासांचा कालावधी लागतो. नुकत्याच एक एका संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीची अंघोळीसाठीची वेळ ही सरासरी 19.5 मिनिटे असते. दरम्यान, नित्यक्रम आणि हवामानानुसार, एखादी व्यक्ती किती काळ अंघोळ करते तेव्हा त्याचा परिणाम होतो.

मात्र तुम्ही कधी एक व्यक्ती दररोज 10 महिन्यांकरिता दररोज 7 तास अंघोळ करत असल्याचे ऐकले आहे? तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र बेंगळुरू आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एकाला दररोज अंघोळ केल्याचा फटका बसला आहे. ऑब्सेसिव-कम्पल्सिव डिसऑर्डरमुळे (OCD) हा मुनष्य सतत अंघोळ करत असे, याला कंटाळून चक्क त्याच्या पत्नीनं घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-भीमा नदीच्या पुलावर झाला भीषण अपघात, यात्रेला जाणाऱ्या बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू

वृत्तानुसार, नुकतीच जेव्हा त्याला उपचारासाठी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा यावेळी त्याची कोरडी त्वचा, नखे आणि केसांखाली जमा केल्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. पीपल ट्री हॉस्पिटलमधील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञाने डेक्कन हेराल्डला सांगितले की, त्या व्यक्तीला अंघोळचे वेड होते कारण त्याला संसर्ग होण्याची भीती वाटत होती.

वाचा-प्रत्येक कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ATMवर मिळणार या 10 सेवा फ्री

डॉ सतीश रमैया यांनी वृत्तपत्राला सांगितले की, 'त्याचा दिवस अंघोळपासूनच सुरू व्हायचा आणि संपायचा. हा रोग असून बाथरूममध्ये दररोज 10 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला जातो. संसर्ग होण्याच्या भीतीने हा मनुष्य सतत आंघोळ करत असे'. मात्र त्याच्या या आगळ्या वेगळ्या सवयीचा फटका त्याला बसला आहे. त्याच्या या सवयीमुळे पत्नी आणि आईला नैराश्याने ग्रासले. डॉक्टर म्हणाले की, तीन महिन्यांपर्यंत विचित्र सवय राहिल्यानंतर शेवटी त्या व्यक्तीला घटस्फोटाचा सामना करावा लागला. डॉक्टर म्हणाले की, सध्या उपचार केले जात आहेत परंतु तणावामुळे पीडितेची प्रकृती आणखी बिकट होऊ शकते.

वाचा-प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी का घेतला शाही राजघराणं सोडण्याचा निर्णय?

Published by: Priyanka Gawde
First published: January 12, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading