Home /News /national /

धावत्या रेल्वेसमोर तरुणाचा सेल्फी व्हिडिओ, रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू

धावत्या रेल्वेसमोर तरुणाचा सेल्फी व्हिडिओ, रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू

धावत्या एक्स्प्रेससमोर उभं राहून सेल्फी काढण्याचं जीवघेणं धाडस एका तरूणाच्या जीवावर बेतलंय.

24 जानेवारी : सेल्फीच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला लाखमोलाचा जीव गमावलाय. तरी देखील सेल्फीचा मोह काही महाभागांना आवरत नाही. धावत्या एक्स्प्रेससमोर उभं राहून सेल्फी काढण्याचं जीवघेणं धाडस एका तरूणाच्या जीवावर बेतलंय. हैदराबादमध्ये एका युवकाने धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढण्याचं धाडस केलं त्यांचं हे धाडस त्याचाच जीवावर बेतला. हा युवक रेल्वे ट्रॅकच्या शेजारी उभं राहुन भरधाव येणाऱ्या रेल्वेसमोर उभं राहुन हातवारे करत सेल्फी व्हिडिओ काढता होता. रेल्वेनं हाॅर्न वाजवूनही त्याने बाजूला होण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. शेवटी जे नाही व्हायचं तेच झालं. भरधाव रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  तेव्हा कृपया करून अशा जीवघेण्या सेल्फीचं धाडस दाखवू नका. क्षणभंगुर सेल्फीसाठी मौल्यवान आयुष्य गमावू नका.
First published:

Tags: Railway, Railway accident, Selfiy video, रेल्वे, सेल्फी व्हिडिओ

पुढील बातम्या