पुलवामा हल्ल्याचं बिहार कनेक्शन; एकाला घेतलं ताब्यात

पुलवामा हल्ल्याचं बिहार कनेक्शन; एकाला घेतलं ताब्यात

पुलवामा हल्ल्याशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बिहारमधून एकाला ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

पटणा, 2 मार्च : पुलवामा हल्ल्यामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहे. सध्या NIA या साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आता बिहारमधील बांका जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेतलं आहे.

गुप्तचर यंत्रणांना ताब्यात घेतलेल्या व्यक्तिचा संबंध थेट जैश - ए - मोहम्मदशी असल्याचा संशय आहे. रेहान असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून शंभूगंजमधील बेलारीमधून त्याला ताब्यात घेतलं गेलं आहे. मात्र नातेवाईकांनी रेहान निर्दोष असल्याचा दावा केला आहे. पुलवामा आत्मघातकी हल्ल्याशी देखील त्याचा थेट संबंध असू शकतो. अशी माहिती देखील आता समोर येत आहे.

दरम्यान, गावातील दोन व्यक्तिंच्या शोधात देखील पोलीस आहेत. त्यातील एकाचं नाव मोहम्मद नौशाद असं आहे. तर, मोहम्मदसह एक जण फरार आहे.  ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मोठा कट ! ISI भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याच्या तयारीत

फिरोजपूरमधून हेराला अटक

शुक्रवारी भारतानं पाकिस्तानच्या हेराला अटक केली होती. पंजाबमधील फिरोजपूरमधून त्याला अटक करण्यात आली. भारत - पाकिस्तान सीमारेषेचे फोटो घेताना त्याला बीएसएफनं अटक केली. यावेळी त्यांची चौकशी करून झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून पाकिस्तानी सीम कार्ड देखील जप्त करण्यात आले. अटक केलेला हेर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील रहिवासी आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

भारत - पाकमध्ये तणाव

14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कडक पावलं उचलली आहेत. दरम्यान भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.

VIDEO : विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एंट्री, पोलीस सहकऱ्यांनी असं केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading