बँक खात्यात चुकून आले 40 लाख; पुढे काय झालं हे वाचून तुमची झोप उडेल!

बँक खात्यात चुकून आले 40 लाख; पुढे काय झालं हे वाचून तुमची झोप उडेल!

काहीही न करता तुमच्या बँक खात्यात अचानक 40 लाख रुपये आले तर...

  • Share this:

चेन्नई, 18 सप्टेंबर: काहीही न करता तुमच्या बँक खात्यात अचानक 40 लाख रुपये आले तर... इतक्या मोठ्या रक्कमेतून तुम्ही अनेक स्वप्न पूर्ण करू शकाल. असाच काही अनुभव विमा एजेंट असलेल्या व्ही गुनशेखरन यांना आला. पण त्यांना मिळालेल्या 40 लाखाची मोठी किमत देखील चुकवावी लागली.

तामिळनाडूमधील तिरुपूर येथील व्ही. गुनशेखरन यांच्या बँक खात्यात 2012 साली अचानक एक दिवशी 40 लाख रुपये आले. गुनशेखर यांनी हे पैसे खात्यात कोठून आले याची चौकशी केली नाही. त्या पैशांतून त्यांनी संपत्ती खरेदी केली, मुलीचे लग्न देखील करून दिले. अचानक आलेले पैशांची चौकशी न करणे त्यांना असे काही महागात पडले की गुनशेखर यांची रवानगी तुरुंगात झाली. सोमवारी येथील एका कोर्टाने त्यांना 3 वर्षाची शिक्षा सुनावली.

काय आहे नेमक प्रकरण?

खासदार आणि आमदार निधीतून लोक निर्माण विभागाला पैसे दिले जाणार होते. पण अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे डिमांड ड्राफ्ट सरकारी खात्यात जाण्याऐवजी गुनशेखरन यांच्या बँक खात्यात जमा झाले. ही दोन्ही खाती तिरुपूरमधील कॉर्पोरेशन बँकेत होती. पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी अधिकाऱ्यांना अद्याप पैसे कमा का झाले नाहीत याची बँकेत चौकशी केली. तेव्हा डिमांड ड्राफ्टवर जो बँक नंबर लिहला आहे तो चुकीचा असल्याचे लक्षात आले.

जेव्हा बँकेने गुनशेखरन यांचे खाते तपासले तेव्हा त्यांनी ते सर्व पैसे खर्च केल्याचे लक्षात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुनशेखर यांना पैसे परत करण्याची विनंती केली. पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर 2015मध्ये बँकेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुनशेखरन आणि त्यांच्या पत्नीवर कलम 403 आणि कलम 120 बी अन्वये गुन्हा चालवण्यात आला. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि गुनशेखरन यांची बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निकाल दिली. न्यायालयाने गुनशेखरन यांना 3 वर्षाची शिक्षा सुनावली.

VIDEO किती जणांचे एन्काउंटर केले? पाहा प्रदीप शर्मांनी पहिल्यांदाच दिलंय यावरचं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या