विवाहित प्रेयसीला जिवंत जाळलं, तिचा 5 वर्षांचा मुलगाही आगीच्या ज्वालात होरपळला

विवाहित प्रेयसीला जिवंत जाळलं, तिचा 5 वर्षांचा मुलगाही आगीच्या ज्वालात होरपळला

आईला जळत असताना बघून 5 वर्षांचा मुलगा तिच्या जवळ गेला आणि...

  • Share this:

बरेली, 28 जानेवारी : एका विवाहित महिलेला तिच्या घरातून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावून दिली. या घटनेत महिला गंभीर स्वरुपात जळाली आहे.

या महिलेला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती तब्बल 35 टक्के जळालीची माहिती समोर आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. सुभाषनगर भागातील एका गावात राहणारी 32 वर्षीय महिलेला रविवारी सायंकाळी रुग्णालयात आणण्यात आले. महिलेच्या पतीने सांगितल्यानुसार सुभाषनगर पोलीस आणि मॅजिस्ट्रेटने त्याची बाजू लिहून घेतली आहे. पतीने बिथरीमधील मेहतरपूर गावात राहाणारा विनोद कश्यप याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या पतीने सांगितल्यानुसार, रविवारी तो कामावर गेला होता. घरात त्याची बायको, आई आणि दोन मुलं होती. यादरम्यान विनोद कश्यपने नामक व्यक्ती त्याच्या घरी गेला. आणि तक्रारदाराच्या पत्नीला जबरदस्तीने आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यानंतर विनोदने आपल्या जॅकेटमध्ये लपवलेली पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि महिलेच्या अंगावर ओतली.

आगीमध्ये होरपळणारी महिला जिवाच्या आकांताने ओरडत होती. यावेळी आईला जळत असताना बघून 5 वर्षांचा मुलगा तिच्या जवळ गेला. त्यामुळे तो ही आगीने होरपळला आहे. शेजारच्यांना आवाज गेल्याने ते धावत आले व त्यांनी आग विझवली. या घटनेनंतर महिलेला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पेट्रोलची बाटली व लायटर मिळाले आहे. विनोद कश्यप हा तक्रारदाराच्याच गावातील राहणार असून तो महिलेवर बळजबरी करीत असल्याची माहिती सांगितले जात आहे. सध्या पोलीस विनोद कश्यपचा शोध घेत असून आहे. तो सापडल्यानंतर गुन्ह्यामागील नेमक्या कारणाचा खुलासा होईल.

First published: January 28, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading