दीदींचं हेलिकॉप्टर भरकटलं आणि इथे जाऊन पोहोचलं

दीदींचं हेलिकॉप्टर भरकटलं आणि इथे जाऊन पोहोचलं

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सध्या प्रचारासाठी पश्चिम बंगाल पिंजून काढत आहेत. अशाच एका सभेच्या वेळी त्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. या घटनेमुळे त्या सभेच्या ठिकाणी अर्धा तास उशिरा पोहोचल्या.

  • Share this:

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सध्या प्रचारासाठी पश्चिम बंगाल पिंजून काढत आहेत. अशाच एका सभेच्या वेळी त्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. या घटनेमुळे त्या सभेच्या ठिकाणी अर्धा तास उशिरा पोहोचल्या.

ममतांचं हेलिकॉप्टर भरकटून बांग्लादेशच्या सीमेवर जाऊ पोहोचलं. आता या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेमध्ये दिरंगाई झाली, असा आरोप आता होतो आहे.

ममतांना दिनाजपूरमधल्या एका सभेसाठी जायचं होतं. पण ज्या हेलिकॉप्टरने ममता जात होत्या ते हेलिकॉप्टर भरकटल्याने गोंधळ झाला.

बुधवारी दुपारी एक वाजून ५ मिनिटांनी ममतांचं हे विमान भरकटलं. ममता सिलिगडीहून वेळेत निघाल्या पण विमान भरकटल्यामुळे त्या दुपारी दोननंतर सभेच्या ठिकाणी पोहोचल्या.

ममतांनी सभेच्या ठिकाणी लोकांची माफी मागितली. हेलिकॉप्टरची दिशा चुकल्यामुळे सभेला यायला उशीर झाला, असं त्या म्हणाल्या. त्यांचं हे हेलिकॉप्टर चुकून बिहारकडे वळलं. पण पायलटने स्मोक गन आणि सिग्नलच्या मदतीने हे विमान सभेच्या ठिकाणी वळवलं.

पश्चिम बंगालमध्ये ११ एप्रिलपासून मतदान सुरू होतं आहे. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी ममता आणि भाजपमध्ये जोरदार चुरस लागली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी मात्र भाजपला आपल्या जागांची संख्या वाढवायची आहे.

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष, भाजप, काँग्रेस आणि ममतांचं तृणमूल काँग्रेस अशा चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. या लढतींमध्ये ममता बॅनर्जी बंगालचा गड राखण्यात यशस्वी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

==================================================================================================================================

VIDEO : त्यावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांचा खुलासा

First published: April 10, 2019, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading