मराठी बातम्या /बातम्या /देश /

Mamata Banerjee Health Update: ममता बॅनर्जींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, व्हील चेअरवरून करणार प्रचार

Mamata Banerjee Health Update: ममता बॅनर्जींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, व्हील चेअरवरून करणार प्रचार

Mamata Banerjee Injury: ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. बंगाल निवडणुकांआधी झालेल्या या घटनेमुळे संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नंदीग्राम, 12 मार्च: ममता बॅनर्जी जखमी (Mamata Banerjee Injured) झाल्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजली होती. ममता बॅनर्जी यांना डिस्चार्ज कधी मिळणार? त्या पुन्हा प्रचारात सहभागी होणार का? असे अनेक प्रश्न यावेळी विचारले जात आहेत. ममता बॅनर्जी सध्या कोलकाता याठिकाणी रुग्णालयात भरती आहेत. हाडाला मार लागल्यामुळे त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर (West Bengal Assembly Election 2021) हा प्रकार घडला आहे.

दरम्यान अशी माहिती समोर आली होती की त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दुपारी एक व्हिडीओ जारी करत असे म्हटले आहे की 13 मार्च रोजी त्या पुरुलियाच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये त्या व्हील चेअरवरुन सहभागी होतील. यावेळी त्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांकडे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

डॉक्टरांच्या मते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तब्येतीमध्ये काहीशी सुधारणा होत आहे आणि त्यांची परिस्थिती सध्या स्थीर आहे. सरकारी एसएसकेएम रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी कार्यरत डॉक्टरांनी ही माहिती दिली. त्यांनी असे म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांच्या काही टेस्ट झाल्या त्याचे अहवाल दिलासादायक आहेत. उपचारामुळे त्यांना फायदा होत आहे.

कुठे झाली आहे जखम?

सरकारी एसएसकेएम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांच्या डाव्या पायाचा एक एक्स-रे केला गेला ज्यामध्ये 'डीजेनेरेटिव जॉइंट डिसिज'बाबत आढळून आला आहे. डीजेनेरेटिव जॉइंट डिसिज हा संधिवातचा एक प्रकार आहे आणि जेव्हा हाडांच्या टोकांवरील लवचिक ऊती नष्ट होण्यास सुरवात होते तेव्हा हा रोग उद्भवतो. मुख्यमंत्र्यांच्या डाव्या घोट्याच्या आणि पायाच्या हाडांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याव्यतिरिक्त, त्याच्या डाव्या खांद्यावर, मनगटाला आणि मान यांनाही जखम आहेत.

First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, West Bengal Election