मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीत सोनिया-ममतांची ‘चाय पे चर्चा’, उचलला विरोधकांना एकवटण्याचा विडा

दिल्लीत सोनिया-ममतांची ‘चाय पे चर्चा’, उचलला विरोधकांना एकवटण्याचा विडा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी (West Bengal Chief Minister) विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेलेल्या ममता बॅनर्जींनी (Mamta Banarjee) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची (Sonia Gandhi) त्यांच्या निवासस्थानी (residence) भेट घेतली.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 28 जून : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी (West Bengal Chief Minister) विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेलेल्या ममता बॅनर्जींनी (Mamta Banarjee) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची (Sonia Gandhi) त्यांच्या निवासस्थानी (residence) भेट घेतली. सोनिया गांधींनी आपल्याला चहाचं निमंत्रण दिल्याचं कायममता बॅनर्जींनी सांगितलं. देशातील ज्वलंत प्रश्नांपासून ते विरोधकांच्या एकजुटीपर्यंत अनेक विषयांवर आपली चर्चा झाल्याचं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं. दिल्लीत भेटीगाठींचं सत्र दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेव्हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना भेटल्या, त्यावेळी राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर ममतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आनंद शर्मांसह विविध विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी आता 2024 च्या तयारीला लागल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? देशातील सर्व विरोधकांची एकजूट व्हावी, हेच सोनिया गांधींचं मत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. काँग्रेसचा सर्वसमावेशकतेवर विश्वास असून देशातील छोट्या पक्षांचाही काँग्रेसवरच अधिक विश्वास असल्याचं त्या म्हणाल्या. सध्या देशावर आलेलं कोरोनाचं संकट आणि पेगॅसिस पाळत प्रकरणावरही आपण सोनिया गांधींशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपला टक्कर द्यायची असेल, तर देशपातळीवर सर्व विरोधकांनी एकत्र यायची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. हे वाचा - मनसे जोशात! पिता-पुत्राची वेगवेगळी जिल्हावारी बिगरभाजप मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध देशात बिगरभाजप मुख्यमंत्र्यांसोबत आपले सलोख्याचे संबंध असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन या सर्वांसोबत आपले सलोख्याचे संबंध असून हे सर्व एकत्र आले, तर भाजपला पराभूत करणं सहज शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Delhi, Mamta Banerjee, Sonia gandhi

पुढील बातम्या