News18 Lokmat

जय श्री रामचे नारे; ममता बॅनर्जी भडकल्या

जय श्री राम अशी घोषणाबाजी केल्यानं ममता बॅनर्जी भडकल्या.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 04:12 PM IST

जय श्री रामचे नारे; ममता बॅनर्जी भडकल्या

कोलकाता, 31 मे : पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्री राम अशी घोषणाबाजी करण्यात आल्यानं त्यांना राग आला. ममता बॅनर्जी आंदोलन करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्यासमोर जय श्री राम अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी यांना राग आला. त्या आपल्या गाडीमधून खाली उतरल्या. घोषणाबाजी करणारे लोक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. सर्वजण बाहेरून आलेले आहेत. सर्वजण गुन्हेगार असून  घोषणाबाजी करणारे पश्चिम बंगालचे नाहीत अशी प्रतिक्रिया  ममता बॅनर्जी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील जय श्री राम या घोषणेवरून भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोप रंगले होते.


निर्मला सीतारामन यांचा पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड!

'आय हेट बीजेपी'

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात हिंसा केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नैहाटी नगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं. या भागातून भाजपला जास्त मतदान झालं. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी नैहाटी या भागाची आंदोलनासाठी निवड केली. यावेळी ममता बॅनर्जी या प्रचंड रागात दिसत होत्या. तर, यावेळी त्यांनी आय हेट बीजेची असं देखील म्हटलं.

Loading...


खुशखबर! मान्सूनसंदर्भात IMD कडून आली एक चांगली बातमी!

अटक करण्याचं अमित शहांचं आव्हान

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यानी लोकसभा निवडणुकीदरम्यान मी जय श्री रामचा जयघोष करणार. हिंम्मत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करून दाखवावं असं आव्हान दिलं होतं. ममता बॅनर्जी आणि अमित शहांनी देखील यापूर्वी परस्परांवर हल्ले – प्रतिहल्ले केले होते. शिवाय, अमित शहांच्या प्रचार रॅलीमध्ये देखील हिंसाचार झाला होता. त्यावरून देखील दोन्ही नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केलं होतं.


VIDEO : खातेवाटपावर शिवसेना नाराज, या आणि इतर महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...