Elec-widget

ममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'!

ममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'!

शनिवारी कोलकत्यात झालेल्या यशस्वी महासभेने ममता बॅनजींचं राजकीय वजन वाढलं आहे.

  • Share this:

कोलकता 20 जानेवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तऱ्हा काही वेगळीच आहे. पांढरी सुती साडी, पायात साध्या चपला आणि खांद्यावर एक शबनम बॅग. दीदींचं हे कायम दिसणारं रूप. मुख्यमंत्री झाल्यावर त्यातली फक्त खांद्यावरची बॅग गेली. बाकी सगळं तसच आहे. आक्रमक स्वभावामुळे त्यांची प्रतिमा भांडखोर अशी झाली होती.


पण दीदी आता बदलल्या आहेत. एवढच नाही तर तृणमूल त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही प्रोजेक्टही करत आहे. कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनाने दीदींचा राष्ट्रीय पातळीवरचा वावर वाढणार आहे. शनिवारी कोलकत्यात झालेल्या यशस्वी महासभेने ममता बॅनजींचं राजकीय वजन वाढलं आहे.


या सभेला देशभरातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवारांपासून ते फारुख अब्दुलांपर्यंत आणि द्रमुकच्या स्टॅलिन यांच्यापासून ते राजदच्या तेजस्वी यादव यांच्यापर्यंत झाडून सर्व नेते एकत्र आले होते. या सर्व नेत्यांचा दीदींनी खास पाहुणचार केला. तृणमूलचे अख्खे मंत्रिमंडळ यासाठी झटत होते.

Loading...


आणि दीदीही प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून होत्या. सभेनंतर सर्व पाहुण्यांना दीदींनी खास बंगाली पद्धतीचं जेवण दिलं. त्याचा मेन्यूही खास होता. प्रत्येक नेत्यांची विचारपूस करत दीदी त्यांना आग्रहाने वाढत होत्या. बंगालचा प्रसिद्ध रसगुल्ला आणि इतर मिठाई यांची जेवणात रेलचेल होती. शुगर फ्री मिठाई सुद्धा उपलब्ध होती.


दीदींच्या पाहुणचाराने सर्व नेते मंडळीही खूष झाली. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीला या पाहुणाचाराने चांगलाच तडका मिळणार आहे अशी देशभर चर्चा आहे तर नेत्यांना आग्रहाने वाढतांनाचा दीदींचा फोटोही चांगलाच व्हायरल होतोय.

VIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...