VIDEO : नेत्याच्या हत्येनंतर ममता बॅनर्जींविरोधात भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

VIDEO : नेत्याच्या हत्येनंतर ममता बॅनर्जींविरोधात भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

प. बंगालमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अंगावर शहारे आणणारा VIDEO

  • Share this:

कोलकाता, 08 ऑक्टोबर : कोलकातामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरानं वाहात आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात पक्षनेते मनीष शुक्ला यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज भाजपा कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये निदर्शने केली. या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने रोखण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनॉनचा वापर केल्याची केला इतकच नाही तर अश्रूधुराचा वापर देखील करण्यात आला आणि जमाव ऐकत नाही हे पाहून पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केला आहे. भाजपने केलेल्या निदर्शनांमध्ये कैलास विजयवर्गीय देखील सहभागी झाले होते.

पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली. दोन्ही बाजूनं वातारण तापल्यामुऴे परिसरात पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे.

हे वाचा-एक राजा बिनडोक तर दुसरा.., प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे-संभाजीराजेंवर जहरी टीका

तर भाजप कार्यकर्त्यांनी सचिवालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करण्यात आला.

तर या संतप्त जमावानं निषेध करण्यासाठी पोलिसांवर तुफान दगडफेक आणि जाळपोळ केल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे सचिवालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी अडवणूक केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे परगणा इथे सध्या परिस्थिती तणावाची आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 2:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या