पुन्हा मोदींसाठी अनलकी ठरणार ममता बॅनर्जींचा वुमन्स डे?

पुन्हा मोदींसाठी अनलकी ठरणार ममता बॅनर्जींचा वुमन्स डे?

ममता बॅनर्जी आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे ममतांचा करिष्मा लोकसभा निवडणुकीमध्ये चालणार का? हे पाहावं लागणार आहे.

  • Share this:

कोलकत्ता, 8 मार्च : 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. याच दिवशी तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे 2014 आणि 2016 प्रमाणे या वर्षीचा वुमन्स डे देखील ममतांना लकी ठरणार का? हे पाहावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागून राहिलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी 8मार्चला प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यावेळी देखील तृणमुलला मोठा विजय मिळाला होता. तर, 2016मध्ये देखील विधानसभा निवडणुकीमध्ये ममतांनी वुमन्स डेच्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडत, स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ममतांचा करिष्मा चालणार का? हे पाहावं लागणार आहे.

राफेल वाद : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर खळबळजनक आरोप

ममतांसाठी वुमन्स डे मोदींसाठी अनलकी?

2014मध्ये संपूर्ण देश मोदी लाटेवर स्वार झाला होता. मोदींचा करिष्मा आणि प्रचाराचा झंझावात पाहता दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा देखील मोठा पराभव झाला होता. पण, पश्चिम बंगागलमध्ये मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही. याउलट 42 जागांपैकी तृणमुल काँग्रेस 34 जागांवर विजयी झाली. लोकसभा 2014मध्ये देखील ममतांनी 8 मार्च अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच प्रचाराचा नारळ फोडला होता. तर, 2016मध्ये देखील ममतांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ देखील महिला दिनाच्या दिवशी फोडला होता.

या दोन्ही निवडणुकांमध्ये तृणमुल काँग्रेसनं मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर आता 2019मध्ये देखील ममता महिला दिनाच्या दिवशीच प्रचाराची सुरूवात करणार आहेत. त्यामुळे आता 2019मध्ये देखील महिला दिन ममतांना लकी ठरणार का? हे पाहावं लागणार आहे.

भाजप - ममता वाद

पश्चिम बंगालमधील भाजप - ममता वाद आता काही लपून राहिला नाही. भाजपच्या राज्यव्यापी रथयात्रेला राज्य सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. शिवाय, शारदा चीट फंड प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या दोन्ही प्रकरणांमध्ये ममता आणि भाजपनं परस्परांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यापूर्वी चंद्रबाबू नायडू आणि ममतांनी राज्यात सीबीआयला प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अधिक रंगत येणार आहे.

VIDEO : पंकजांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा 'मोदी पॅटर्न'

First published: March 8, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading