ममतांचं मीम्स प्रकरण : प्रियांका, तु चुकलीस माफी माग - SC

ममतांचं मीम्स प्रकरण : प्रियांका, तु चुकलीस माफी माग - SC

भाजप नेत्या प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जींची माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. याप्रकरणात प्रियांका शर्मा यांना अटक देखील झाली. सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयानं भाजपच्या नेत्या प्रियांका शर्मा यांना जामीन मंजूर केला असून ममता बॅनर्जींची कोर्टातून बाहेर पडल्यानंतर लगेचच माफी मागा असे आदेश दिले आहेत. प्रियांका शर्मा यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या जागी ममता बॅनर्जींचा चेहरा लावला होता. त्यानंतर तो फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता.
मी योग्यच बोललो होतो, नरेंद्र मोदी नीच आहेत- मणिशंकर अय्यर

ममतांचं मीम्स काय होतं?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेट गालामध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिच्या लुक्सवर सर्वत्र चर्चा झाली होती. सोशल मीडियावर देखील त्यावर उलट – सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. तोच फोटो प्रियांक शर्मा यांनी वापरत त्याठिकाणी ममतांचा चेहरा लावला होता. शिवाय तो फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर देखील केला होता.

प्रियांका शर्मा या भाजप युवा मोर्चाच्या नेत्या आहेत. अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. तृणमुल काँग्रेसचे नेते विश्वासचंद्र हाजरा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. प्रियांका शर्मा यांच्या अटकेवर भाजपनं सवाल केले होते. पण, आता सर्वोच्च न्यायालय़ानं ममता बॅनर्जींची माफी मागा असे आदेश दिले आहेत.


VIDEO: केरळमध्ये त्रिशूर पौर्णिमेनिमित्त गजराजाकडून मानवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या