हिंदू विरोधी मानसिकतेचा आरोप टाळण्यासाठी ममता बॅनर्जी पुजाऱ्यांना देणार मासिक भत्ता?

हिंदू विरोधी मानसिकतेचा आरोप टाळण्यासाठी ममता बॅनर्जी पुजाऱ्यांना देणार मासिक भत्ता?

याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • Share this:

कोलकाता, 15 सप्टेंबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील 8000 गरीब पुजार्‍यांना मासिक 1000 रुपये भत्ता आणि मोफत निवासस्थान देण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी घेण्यात आला आहे. याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या निर्णयाबाबत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, "आम्ही यापूर्वी कोनाघाटमध्ये अकादमी सुरू करण्यासाठी सनातन ब्राह्मण संप्रदायाला जमीन दिली होती. या पंथातील बरेच पुजारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. आम्ही त्यांना दरमहा 1000 रुपये भत्ता देण्याचा आणि राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत मोफत घरे देऊन त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ''

वाचा-प.बंगालमध्ये ममता दीदी पुजाऱ्यांना देणार घर आणि महिन्याला हजार रुपये!

दरम्यान 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांचे सरकार सर्व भाषांचा आदर करते आणि भाषिक कारणास्तव कोणताही पक्षपात नाही. “आम्ही सर्व भाषांचा आदर करतो,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच, आम्ही नवीन हिंदी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दलित साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाली भाषेवर दलितांच्या भाषेचा प्रभाव आहे, असेही त्या म्हणाल्या.

वाचा-मोदी सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संताप, कांद्याच्या निर्यातीवर लादली बंदी

अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा आरोप

महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला ममता बॅनर्जी कडक आव्हान देऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. भाजप त्यावेळी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता. ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा आरोप अनेकदा भाजपने केला आहे. या आरोपांच्या आधारेच भाजपने लोकसभेत मतं मिळवली, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळेच पुजार्‍यांना मासिक 1000 रुपये भत्ता आणि मोफत निवासस्थान देण्याचे जाहीर केले असावे.

हिंदू विरोधी मानसिकता असल्याचा भाजपकडून आरोप

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांचं सरकार हे हिंदू विरोधी मानसिकतेचं असल्याचा आरोप केला आहे. त्या फक्त मतांसाठी तुष्टीकरणाचं राजकारण करतात असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या राज्य कार्यकारणीला संबोधित करतांना त्यांनी हा आरोप केला. ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध भाजपने जोरदार मोहिम सुरू केली आहे. सरकार हे मुस्लिमांचं मतांसाठी लांगूनलाचन करते असा भाजपचा आरोप आहे. भाजपच्या अनेक कर्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे असा आरोपही भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी केला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या