आता देशात बदल हवा, कोलकात्यातून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

"मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशाचा त्रास दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं आहे"

News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2019 05:42 PM IST

आता देशात बदल हवा, कोलकात्यातून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

19 जानेवारी :  'गेल्या 50 वर्षात मला तुम्ही खूप काही दिले आहे. आता काही नको, आता हवंय ते म्हणजे या देशात बदल हवा आहे', असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच 'आम्ही एकत्र आलोय आणि तुम्हाला वचन देतो. आज देशात जे मोदी सरकार आहे, त्याचं परिवर्तन करणार', अशी टीकाही पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली होती. या सभेच्या निमित्ताने महाआघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, 'मोदी सरकारने देशाच्या प्रमुख संस्थांवर आणि संविधानावर हल्ला केला आहे. मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशाचा त्रास दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं आहे.  उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. भाजप पंतप्रधान मोदींसाठी लढत आहे. तर आम्ही मोदी सरकारला हटवण्यासाठी एकत्र आलो आहे.'

'मोदींना का टार्गेट करू नये'

तर ममता बॅनर्जी यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. 'माझी पंतप्रधान होण्याची कोणतीही इच्छा नाही. फक्त भाजपला सत्तेवरून दूर झाले पाहिजे. राजकारणात एक लक्ष्मण रेषा असते. ती तुम्ही कधी पार केली नाही पाहिजे. परंतु, पंतप्रधान मोदींनी सर्वांना टार्गेट केलं आहे. मग आम्ही त्यांना का नाही टार्गेट करू नये? आता मोदींची एक्सपायरी डेट आली आहे. त्यांना सांगावे लागणार आहे की त्यांचा वेळ आता पूर्ण झाला आहे.' अशी टीका ममतांनी केली.

Loading...

'बंगालमध्ये भाजपच्या दोन जागा आहे. काही दिवस थांबा, महाआघाडी आपले काम करून दाखवेल. हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी यांनीही पुढे आलं पाहिजे, असं आवाहन ममतांनी केलं आहे.

ममतांची आॅगस्टपासून तयारी

कोलकात्यात झालेली ही सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. ममता यांनी गेल्या ऑगस्टपासून एकता सभेची तयारी केली होती. पावसाळी अधिवेशनात ममतांनी संपूर्ण दिवस संसदेत घालवून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन सभेचं निमंत्रण दिले होते. ही सभा ममतांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा भाग असल्याचंही मानलं जात आहे.


==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...