मराठी बातम्या /बातम्या /देश /

निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जींना पुन्हा झटका; आता 5 आमदारांनी पक्षाला केला राम राम

निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जींना पुन्हा झटका; आता 5 आमदारांनी पक्षाला केला राम राम

Assembly Election 2021 : 7 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला होता. त्यानंतर ही मोठी बातमी समोर येत आहे

    Assembly Election 2021, कोलकाता, 8 मार्च : बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांना जोरदार झटका बसला आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जींची साथ सोडणाऱ्यांमध्ये सोनाली गुहा, दीपेंद्रू बिस्वास, रवींद्रनाथ भट्टाचार्य, जट्टू लाहिडी, शीतल सरदार आणि हबीबपूर येथील टीएमसी उमेदवार सरला मुर्मू यांचा सहभाग आहे. या सर्वांनी सोमवारी पश्चिम बंगाल भाजपमध्ये प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष, शुभेंद्रु अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्रनाथ भट्टाचार्य 2001 पासून सिंगूर विधानसभा मतदारसंघातून टीएमसीचे आमदार राहिले आहेत. ते सिंगूर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैक एक आहे. यंदा टीएमसीने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. (before assembly elections Now 5 MLAs have left the TMC ) हे ही वाचा-पाच वर्ष बंगालला उद्ध्वस्त केलं', मोदींचा ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 50 महिलांना तिकीट देण्यात आलं आहे. 2016 च्या निवडणुकीत 45 महिलांना पक्षाने उमेदवारी दिली होती. (before assembly elections Now 5 MLAs have left the mamata banrjees party TMC ) बंगाल विधानसभेत 294 जागांसाठी 8 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 विधानसभा जागांवर 27 मार्च रोजी मतदान होईल. तर 1 एप्रिल रोजी दुसरा, 6 एप्रिलला तिसऱ्या, 10 एप्रिल रोजी चौथ्या आणि 17 एप्रिल रोजी 5 व्या टप्प्यात मतदान होईल. सहाव्या टप्प्याचं मतदान 22 एप्रिल, सातव्याचं 26 एप्रिल आणि आठव्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी  मतदान होईल. 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assembly Election 2021, BJP, Kolkata, Mamata banerjee, West bangal

    पुढील बातम्या