हायहोल्टेज ड्रामा : केंद्र सरकारविरुद्ध ममता बॅनर्जी रात्रभर धरणार धरणं!

हायहोल्टेज ड्रामा : केंद्र सरकारविरुद्ध ममता बॅनर्जी रात्रभर धरणार धरणं!

पश्चिम बंगालमधल्या घटनेला पंतप्रधन मोदी आणि अमित शहाच जबाबदार आहेत.

  • Share this:

कोलकता 03 फेब्रुवारी : पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यात रविवारी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. ज्या संस्थांवर चौकशी आणि सुरक्षेची जबाबदारी असते अशा सीबीआय आणि पोलीस या दोन संस्थाच एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने नवा वाद निर्माण झालाय. कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारपासून सत्याग्रह करणार आहेत.

शारदा चिटफंड घोटाळ्यात संशयीत असलेले राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकालाच पश्चिम बंगाल पोलीसांनी ताब्यात घेतलं. हे नाट्य घडत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट आयुक्तांच्या निवासस्थानीच दाखल झाल्या. त्यांच्यासोबच तृणमूलचे नेतेही सोबत होते.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाषणही केलं. त्या म्हणाल्या, ''आजचा दिवस अतिशय वाईट आहे. हा केंद्राने केलेला राज्यांवरहा हल्ला आहे. याला पंतप्रधन मोदी आणि अमित शहाच जबाबदार आहेत. राजीव कुमार हे जगातले सर्वोत्तम पोलीस अधिकारी आहेत.'' अशी टीका करत असतानाच केंद्र सरकारविरूद्ध सोमवारपासून उपोषण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

काय झालं कोलकत्यात

पश्चिम बंगालमधील पोलीस आणि सीबीआयमध्ये सुरू असलेल्या वादाचा पुढचा अध्याय पाहायाला मिळाला. बहुचर्चित शारदा चिटफंट घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. या घोटाळ्यामध्ये कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचं देखील नाव आहे.

त्यामुळे त्यांच्या घरी छापा मारण्यासाठी म्हणून दाखल झालेल्या सीबीआयच्या टीमशी पोलिसांची बाचाबाची झाली. यावर हे सारं प्रकरण थांबलं नाही तर, पश्चिम बंगाल पोलिसांनी सीबीआयच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेत थेट पोलीस स्टेशन देखील गाठलं.

या साऱ्या घडामोडींबाबत कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील  पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी दाखल झाल्या. शारदा चिटफंट घोटाळ्यामध्ये तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या सहभागाचाही आरोप आहे.  दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजीव कुमार बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राजीव कुमार यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांनी मात्र राजीव कुमार यांची बाजू घेतली आहे.

 

First published: February 3, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या