भाजप आणि ममतांमध्ये जोरदार 'टशन'; या मुख्यमंत्र्याची सभा रोखली

भाजप आणि ममतांमध्ये जोरदार 'टशन'; या मुख्यमंत्र्याची सभा रोखली

ममता बॅनर्जी सरकारनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरच्या लॅडिंगला परवानगी नाकारली. परिणामी, योगी आदित्यनाथ यांना आपला दौरा रद्द करावा लागला.

  • Share this:

कोलकाता, 03 फ्रेब्रुवारी: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता प्रचारसभांना वेग येत आहे. भाजपनं लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पण, पश्चिम बंगालमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद आता दिवसेंदिवस अधिकच गंभीर आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. यावेळी ममता बनर्जी सरकारनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला लॅडिंगला परवनगी नाकारली. परिणामी, योगी आदित्यनाथ यांना आपला दिनाजपूर दौरा रद्द करावा लागण्याची नामुष्की ओढावली. यावर, सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरच्या लॅडिंगला परवानगी नाकारल्याचं पश्चिम बंगाल सरकारनं स्पष्ट केलं. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जीं विरोधात जोरदार निदर्शनं देखील केली. या साऱ्या प्रकारानंतर ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, दौरा रद्द करावा लागल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. यापूर्वी अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यावरून देखील वाद झाला होता.

हे देखील वाचा: राहुल गांधीं पाठोपाठ PM मोदी देखील आक्रमक; केंद्रातील पुढील सरकार भाजपचेच!

ममता बॅनर्जी आणि भाजप सरकारमधील वाद काही नवा नाही. यापूर्वी देखील भाजपनं आयोजित केलेल्या रथ यात्रेला राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा सार वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील पोहोचला होता.

शिवाय, भाजप सरकारवर हूकुमशाहीचा आरोप करत ममत बॅनर्जी यांनी सीबीआयला राज्यामध्ये प्रवेश बंदी केली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील सीबीआयला राज्यात प्रवेश बंदी केली आहे. पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमध्ये सुरू झालेला हा वाद अद्यापही संपलेला नाही. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमद्ये देखील गोंधळ झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ १५ मिनिटामध्ये सभा उरकावी लागली होती.

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांची सभा घेऊन भाजपला आव्हानच दिले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये होणारे जागेचे नुकसान भाजपला प.बंगालमधून भरून काढायचे आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात जोरदार राजकीय शक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात डाव्यांची जागा भाजपला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत घेण्याची इच्छा आहे. त्याच बांगलादेशी नागरिकांच्या मुद्यावर भाजपने ममतांना कोंडीत पकडले आहे.

26 /11 दहशतवादी हल्ल्या प्रकरणी 2 पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट

First published: February 3, 2019, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading