नंदीग्रामची लढाई आता कोर्टात, ममतांनी न्यायाधीश बदलण्याची केली मागणी कारण...

नंदीग्रामची लढाई आता कोर्टात, ममतांनी न्यायाधीश बदलण्याची केली मागणी कारण...

नंदीग्रामच्या रणसंग्रामात पराभवानंतर न्यायालयात गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी आता न्यायाधीश बदलण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

कोलकाता, 18 जून : नंदीग्रामच्या रणसंग्रामात पराभवानंतर न्यायालयात गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी आता न्यायाधीश बदलण्याची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कलकत्ता हायकोर्टाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून विनंती केली की, नंदीग्राममधील भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी तिची याचिका दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावी.

या याचिकेवर सुनावणी घेणारे न्यायमूर्ती कौशिक चंदा हे भाजपचे पूर्वी सक्रिय सदस्य राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक याचिकेवरील निर्णयावर त्याचा राजकीय परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करत ममता यांनी हे प्रकरण दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावे, अशी विनंती मुख्य न्यायाधीशांना केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वकिलांकडून देण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कोलकाताच्या उच्च न्यायालयातील स्थायी न्यायाधीश म्हणून संबंधित न्यायाधीशांच्या नावाला मान्यता देण्याबाबतही त्यांनी (ममता) आक्षेप घेतला आहे. संबंधित न्यायाधीश एका पक्षाचे सक्रिय सदस्य होते त्यामुळे त्यांचा निकाल पूर्वग्रहदूषित असू शकतो. निवडणूक याचिका दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावी यासाठी हे पत्र कार्यवाह सरन्यायाधीशांसमोर दिले आहे. जेणेकरून कोणताही पक्षपात होऊ नये यासाठी ममतांच्या वकिलांनी विनंती केली आहे.

हे वाचा - एक किलो केळ्यांना 3300 रुपये; या देशात महागाई आणि उपासमारीने गाठलं टोक

नंदीग्राम येथून शुभेंदू अधिकारी यांची निवडणूक बेकायदेशीर आणि अमान्य घोषित करण्याच्या ममतांच्या याचिकेवरील सुनावणी 24 जूनपर्यंत न्यायमूर्ती कौशिक यांनी तहकूब केली. शुभेंदू सध्या राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेस प्रमुखांची निवडणूक याचिका न्यायमूर्ती कौशिक यांच्याकडे सोपविल्याबद्दल वकिलांच्या गटानेदेखील उच्च न्यायालयासमोर निषेध केला. एका वकिलाने सांगितले की, “न्यायाधीशांशी आमचे वैयक्तिक वैर नाही. पण ते एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी स्व:तहून या खटल्यातून बाजूला व्हायला हवे.

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 11:19 PM IST

ताज्या बातम्या