नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशभरात अद्यापही कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात JEE आणि NEET परीक्षांना विरोध केला जात आहे. त्यासंदर्भात आज काँग्रेसने व्हर्चुअल बैठकीच आयोजन केलं आहे. यामध्ये ममता बॅनर्जी, अमरिंदर सिंह, उद्धव ठाकरे यांच्यासह सोनिया गांधी यांनी सहभाग घेतला. यावेळी जेईई आणि नीट परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा झाली.
एनटीएच्या विरोधात उद्या देशभरातील विद्यार्थी आंदोलन उगारण्याची तयारी करीत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी जेईई आणि नीटची परीक्षा घेण्याला विरोध दर्शविला. याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. यावर त्या म्हणाल्या केंद्र सरकारला वाटतं की त्या परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकत नाही तर विविध राज्यांचे सरकार एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो.
NEET-JEE aspirants are worried about their health & future.
They have genuine concerns of:
- fear of Covid19 infection
- transport & lodging during pandemic
- flood-mayhem in Assam & Bihar.
GOI must listen to all stakeholders & find an acceptable solution.#AntiStudentModiGovt
राहुल गांधीनीही ट्विट करीत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेस बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की कोरोनाच्या कहरात त्यांनी जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात. 1 सप्टेंबरपासून या परीक्षा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनाही व्हर्च्युअल बैठकीत सांगितले की नीट आणि जेईई परीक्षा ऑनलाइन करता येऊ शकतात. त्याशिवाय तीनवेळा मोदींनी शाळा व कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकण्याबाबत पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की परीक्षा घ्यायला हव्यात पण परिस्थितीती सुधारल्यानंतर. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर 97000 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. जर आपल्याबाबत अशी परिस्थिती ओढावली तर काय करणार?