VIDEO : पहाडी भागात 10 किमी धावल्या ममता बॅनर्जी, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हिडिओ

VIDEO : पहाडी भागात 10 किमी धावल्या ममता बॅनर्जी, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हिडिओ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दार्जिलिंगच्या पहाडी भागात 10 किलोमीटर धावल्या. ममता बॅनर्जींनी पर्यावरण जागृतीसाठी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.

  • Share this:

दार्जिलिंग, 25 ऑक्टोबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दार्जिलिंगच्या पहाडी भागात 10 किलोमीटर धावल्या. ममता बॅनर्जींनी पर्यावरण जागृतीसाठी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.

ममता बॅनर्जी त्यांच्या फिटनेसबद्दल नेहमीच जागरुक असतात. त्यांचा हा धावण्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फेसबुकवरचा त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. ममतांनी हे जॉगिंग कुसेराँग महानदीच्या भागात केलं.

त्यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, चांगलं आरोग्य हे सुंदर भविष्यासाठी महत्त्वाचं असतं. मॉर्निंग वॉकसारखी एखादी चांगली सवय आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगली असते.

पर्यावरण रक्षणाची शपथ

ममतांसोबत अधिकारी आणि पत्रकारांनीही या शर्यतीत भाग घेतला. यात सहभागी झालेल्या सगळ्यांनीच पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

आंतरराष्ट्रीय हवामान बदल दिनानिमित्त त्यांनी 23 ऑक्टोबरला एक ट्वीट केलं. आपण सगळेच पर्यावरण रक्षणासाठी सर्व प्रयत्न करायला हवेत. पर्यावरण वाचवा, स्वच्छता पाळा, असा संदेशही त्यांनी दिला.

===========================================================================================

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या