News18 Lokmat

ममतांचे आंदोलन, मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयात सेटबॅक

ममता बॅनर्जींंच्या आंदोलनाचे संसदेत पडसाद, दोन्ही सभागृहात गदारोळ

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 11:58 AM IST

ममतांचे आंदोलन, मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयात सेटबॅक

कोलकत्ता, 4 फेब्रुवारी :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'संविधान वाचवा' धरणे आंदोलनाला सुरुवात केली. सीबीआय विरुद्ध कोलकता पोलीस या नाट्यानंतर कोलकत्यात तणाव निर्माण झाला होता.  यावेळी केंद्र  सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जींनी धरणं आंदोलन सुरू केलं.

कोलकत्त्याच्या पोलिस कमिशन राजीव कुमार यांच्याविरोधातील सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. जर पुरावे नष्ट करण्याच आल्याचे सिद्ध झाले तर कठोर कारवाई करण्याच येईल असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून राज्यसभा आणि लोकसभेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

ममतांच्या या आंदोलनाला देशभरातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काल रात्रीपासून आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्यासोबत कोलकत्त्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमारदेखील आंदोलनाला बसले आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआयच्या कार्यालयाबाहेर सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Loading...

त्यानंतर रात्री उशीरा कोलकता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर शहरात तणाव निर्माण झालाय. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे जाळले असून काही ठिकाणी ट्रेनही थांबविण्यात आल्या आहेत.


मोदी विरुद्ध ममता संघर्षाचं कारण काय?

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद काही नवे नाहीत. पण सध्या मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार यांच्यात सुरु असलेला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या संघर्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचा जसा संदर्भ आहे तसाच ममता यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा देखील आहे. मोदी सरकार ममता यांना कोंडी पकडण्याची संधी सोडत नाही. मोदी विरुद्ध ममता या संघर्षाचे नेमके काय कारण आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

काय आहे नेमके प्रकरण

रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड प्रकरणी सीबीआय कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार यांना अटक होणार आहे. चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कुमार यांच्यावर संशय आहे. याआधी सीबीआयने त्यांना दोन वेळा समन्स बजावले होते तरी त्यांनी चौकशीत सहकार्य केले नाही. या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे 40 जणांचे पथक कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. रोझ व्हॅली घोटाळा 15 हजार कोटी तर शारदा चिटफंड घोटाळा 2 हजार 500 कोटी रुपयांचा आहे.

काय आहे रोझ व्हॅली घोटाळा

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत. रोझ व्हॅली ग्रुपने सामान्य लोकांकडून पैसे घेत 1 लाख गुंतवणूकदारांना चुना लावला. आशीर्वाद आणि हॉलिडे मेंबरशिप नावाखाली ग्रुपने लोकांकडून पैसे घेतले होते. शिवमय दत्ता हा या घोटाळ्याचा मास्टर माईंड असल्याचे बोलले जाते.

शारदा चिटफंड घोटाळा

अधिक पैसे देण्याची ऑफर देऊन शारदा ग्रुपने लोकांची फसवणूक केली होती. यात 1 लाख रुपयांची गुंतवणू्क केल्यास 25 वर्षानंतर 34 लाख रुपये दिले जातील असे सांगण्यात आले होते. या फंडमध्ये 10 लाख लोकांनी पैसे गुंतवले होते. अखेर कंपनी पैसे घेऊन फरार झाली.

या चिटफंडची चौकशी करणाऱ्या राज्य पोलिस दलाच्या SIT पथकाचे 2013मध्ये राजीव कुमार यांनी नेतृत्व केले होते. सीबीआयच्या मते राजीव यांनी या घोटाळ्यातून काही लोकांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले. त्यामुळेच सीबीआयला राजीव कुमार यांची चौकशी करायची आहे. या दोन्ही घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 80 चार्जशीट फाईल केली आहे. तर एक हजार कोटींहून अधिक रुपये गोळा केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...