काँग्रेसमधली भांडणं सुरूच, ‘वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान’; आता खरगेंनी व्यक्त केला संताप

काँग्रेसमधली भांडणं सुरूच, ‘वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान’; आता खरगेंनी व्यक्त केला संताप

'सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. '

  • Share this:

वी दिल्ली 19 नोव्हेंबर:  बिहारमधल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये (Congress) सुरू झालेलं भांडण थांबण्याचं नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी एका मुलाखतीत काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बलांवर हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सिब्बल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अशा वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खरगे म्हणाले, सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे आणि नेत्यांमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष कमकूवत बनतो असंही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा नष्ट झाली तर आपण सगळेच संपून जाऊ असंही ते म्हणाले.

या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला आहे. उगाच फुकाचे सल्ले देण्यापेक्षा अशा नेत्यांनी काँग्रेस सोडून जावं अशी टीका काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.

सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 रुग्णांमध्ये वाढ, मृत्यूची संख्याही 154 वर

चौधरी म्हणाले, बिहारमधल्या पराभवानंतर अशा वाचाळ नेत्यांना जास्तच जोर चढला आहे. हे नेते कधीही निवडणुकीत विजयी होत नाही. पक्ष संकटांचा सामना करत असताना अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. ज्यांना काँग्रेस योग्य वाटत नसेल त्यांनी अशा लज्जास्पद गोष्टी करण्यापेक्षा पक्षातून निघून जावं, वेगळा पक्ष स्थापन करावा किंवा इतर पक्षात सामील व्हावं. मात्र उगाच सल्ले देत आपला वेळ वाया घालवू नये.

काय म्हणाले होत सिब्बल?

संघटनेची माहिती असलेल्या, अनुभवी, कार्यकर्त्यांना समजून घेणाऱ्या नेत्यांना संघटनेत पुढे आणलं पाहिजे. मात्र नेतृत्वाकडून असे प्रयत्न होत नाहीत. जनाधार असलेल्या नेत्यांचा उपयोग ज्या प्रकारे करायला पाहिजे तसा होत नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांच्यासह पक्षातल्या 32 नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या पत्रानंतरही नेतृत्वा करणाऱ्यांच्या शैलीत कुठलाही बदल झाला नाही. त्यांच्याकडून संवादाचा प्रयत्नही झाला नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी माध्यमांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत (Rajasthan CM Ashok gehlot) यांनीही सिब्बल यांच्यावर टीका केलीय पक्षांतर्गत मुद्दे जाहीर करण्याची सिब्बल यांना काहीही गरज नव्हती. माध्यमात जावून काहीही साध्य होणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस नेत्यांमध्येच सोशल मीडियावर भांडण जुंपल्याने पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

दहशतवादी मुल्ला ओमरला पाक सैन्यानं ठार मारले, कुलभूषण जाधव यांचे केले होते अपहरण

कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्ष अनेक संकटांमधून गेला आहे. या संकटामधूनही पुन्हा एकदा काँग्रेस झेप घेईल असंही गहेलोत यांनी म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 19, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या