मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपातून मुक्त करण्यात यावं, साध्वी प्रज्ञा सिंहांची मागणी

मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपातून मुक्त करण्यात यावं, साध्वी प्रज्ञा सिंहांची मागणी

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएनं याबद्दलच आपलं म्हणणं मांडावं असा आदेश कोर्टाने दिला आहे.

  • Share this:

04 मे :  2008 सालच्या मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर आता त्यांनी आपल्याला या प्रकरणातील आरोपातून मुक्त करण्यात यावं, असा अर्ज विशेष एनआयए कोर्टाकडे दिला आहे. याबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएनं याबद्दलच आपलं म्हणणं मांडावं असा आदेश कोर्टाने दिला आहे.

राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने साध्वीला या प्रकरणात2009 साली दोषी मानलं होतं. तर एनआयएने 2016 साली पुरवणी आरोपपत्र दाखल करत तिला क्लीन चीट दिली होती. गेल्याच आठवड्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टानं तिच्याविरोधात सकृतदर्शनी पुरावा नसल्याचं म्हटलं होतं. त्याचाच आधार घेत आपल्याला सर्व आरोपातून मुक्तता करण्यात यावं, असा अर्ज साध्वी प्रज्ञा सिंहने विशेष एनआयए कोर्टासमोर केला आहे.

First published: May 4, 2017, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading