मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावरचा मोक्का हटवला

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावरचा मोक्का हटवला

तसंच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद पुरोहित यांच्यासह समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी यांच्यावरचाही मोक्का हटवलाय.

  • Share this:

27 डिसेंबर : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने आज आरोपनिश्चीती केली आहे. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवला आहे. त्यामुळे या आरोपींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी  रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्यावरचाही मोक्का हटवण्यात आलाय. यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले आहे. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटका केलीये. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारी असणार आहे.

याआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि आॅगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी स्पेशल मोक्का कोर्टाने

साध्वी प्रज्ञा सिंह आणि पुरोहित यांच्या अन्य नऊ जणांवर चुकीच्या पद्धतीने मोक्का लावण्यात आला आहे असं नमूद केलंय. तसंच समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी यांच्यावरचाही मोक्का हटवलाय.  मालेगाव बॉम्बस्फोटामधील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन वाढवला आहे.

असं असलं तरीही UAPA चं कलम १८ तसंच प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद पुरोहित यांच्यावर आयपीसीच्या अंतर्गत 120 B , 302, 307, 304, 326 , 427 153 A खटला चालणार आहे. यात गुन्हेगारी कट रचणे आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह यांना आपल्या मोटरसायकलीचा वापर कशासाठी केला जातोय पूर्ण कल्पना असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच कर्नल प्रसाद पुरोहित यांचं दोषमुक्ततेचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तर काही आरोपींना कोर्टानं दोषमुक्त केलं आहे.

यांच्यावरचा मोक्का हटवला

- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

- कर्नल प्रसाद पुरोहित

- समीर कुलकर्णी

- रमेश उपाध्याय

-  सुधाकर द्विवेदी

दोषमुक्त आरोपींची नावं

- श्याम शाहू

- प्रविण टक्कलकी

- शिवनारायण कालसंग्रा

घातक शस्रास कायद्यानुसार खटला चालणार

- राकेश धावडे

- जगदीश म्हात्रे

First published: December 27, 2017, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading