काँग्रेसनं षड्यंत्र रचून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात गोवलं -साध्वी प्रज्ञा सिंग

आपल्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. यासाठी शहीद हेमंत करकरेंसह अन्य चार एटीएस ऑफिसर जबाबदार असल्याचं तिचं म्हणणं आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2017 06:21 PM IST

काँग्रेसनं षड्यंत्र रचून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात गोवलं -साध्वी प्रज्ञा सिंग

27 एप्रिल : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आज साध्वी प्रज्ञा सिंग माध्यमांना सामोरी गेली. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून काँग्रेसने षडयंत्र रचून आपल्याला या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा साध्वीनी केलाय.

आपल्याला सुरतहून अटक केल्यानंतर कोणत्याही परवानगीविना मुंबई एटीएसने आपल्याला मुंबईला नेलं. त्यानंतर आपल्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. यासाठी शहीद हेमंत करकरेंसह अन्य चार एटीएस ऑफिसर जबाबदार असल्याचं तिचं म्हणणं आहे.

या सगळ्यांनी केलेल्या अत्याचारांमुळेच आज आपण परावलंबी आयुष्य जगत आहोत. मात्र आता आपली खटल्यातून निर्दोष मुक्तता केल्यामुळे भगव्या आतंकवादाची उदाहरणं देणाऱ्या लोकांची तोंडं कायमची बंद झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...