‘राहुल गांधींनाच अध्यक्ष करा’; काँग्रेस नेत्याने स्वत:च्या रक्ताने लिहिलं पत्र

‘राहुल गांधींनाच अध्यक्ष करा’; काँग्रेस नेत्याने स्वत:च्या रक्ताने लिहिलं पत्र

राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा नकार दिल्याने आता कोण होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी काँग्रेस कार्य समिती (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीत पद सोडण्याबाबत सांगितले आणि त्या पुढे म्हणाल्या की नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करा. तर नेतृत्वच्या मुद्द्यावरुन काँग्रेस दोन भागात विभागली गेली आहे. एक पक्ष राहुल गांधी यांना समर्थन देत आहे, तर दुसरा पक्ष गांधी कुटुंबीयापासून वेगळ्या नेतृत्वाबाबत चर्चा करीत आहे.

यादरम्यान काँग्रेस नेता संदीप तंवर यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून राहुल गांधी यांना काँग्रेसचा अध्यक्ष करा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर राहुल गांधी जर अध्यक्ष झाले नाहीत तर हा निर्णय पक्षाच्या विरोधात होईल.

हे वाचा-'मी दुखावले गेलेय' : काँग्रेस नाट्यात सोनियांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

संदीर तंवर यांने पत्रात लिहिले आहे की, राहुल गांधी यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. वाईट परिस्थितीत देशातील लोकांसाठी आवाज उठवला आहे. जर राहुल गांधी अध्यक्ष झाले नाही, तर निर्णय पक्षाच्या हिताचा नसेल. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे वाचा-‘राजकारणातून गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं’ काँग्रेसवर भाजपची टीका

दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पार्टीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच पक्षाचा अध्यक्ष व्हायचं नाही. इतकचं नाही तर दिल्ली काँग्रेसने राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी एक प्रस्ताव पार केला आहे. ज्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व प्रदाश करण्यासाठी राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचा अध्यक्ष बनविण्याची मागणी केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 8:07 PM IST

ताज्या बातम्या