हरेंद्र सिंग
खंडवा, 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. प्रेयसीला गिफ्ट देण्याचं वचन दिलेल्या एका तरुणाने असं काही केलं की ज्याचा कोणीही विचार करू शकत नाही. वचन पूर्ण करण्यासाठी मुलीच्या वडिलांचीच हत्या तरुणाने केली. त्याने दिवाळीच्या दिवशी वचन दिलं होतं की, तो तिच्या वडिलांचा खून करेल. यासाठी त्याने एका गुंडाला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. खून होत असताना तरुण तिथं उपस्थित होता. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मदत केली.
मध्यप्रदेशातील खंडवा इथल्या या हत्याकांडाचा उलगडा गुरुवारी झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी प्रियकर श्रवण आणि त्याचा साथीदार जग्गा यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चाकूसह एक मोपेड जप्त केली आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला प्रल्हाद जगन्नातथ चंडेल यांचा मृतदेह घोडापछाड नदीत मिळाला होता. त्यांच्या डोक्यावर जखमेचे व्रण आढळले होते. त्यांच्या हत्येचा तपास सुरु करण्यात आला होता. त्यानतंर शवविच्छेदनात प्रल्हाद यांची हत्या झाल्याचे समोर आले होते.
हत्येनंतर प्रल्हाद यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. जवळपास तीन महिन्यांनी आरोपी जगदीश जगराज आणि श्रवण लक्ष्मीनारायण यांना अटक केली. आरोपींनी खून केल्याचं कबूल केलं आहे.
पोलिस तपासात आरोपी श्रवणने सांगितलं की, प्रल्हाद यांच्या मुलीवर प्रेम होते. याला प्रल्हाद यांचा विरोध होता. हा अडथळा दूर करायचा होता. म्हणूनच प्रेयसीला दिवाळीच्या रात्री वडिलांना संपवणार असल्याचं सांगितलं होतं. दिवाळीला इतका आनंद देईन की तुला तो सहन होणार नाही असंही म्हटलं होतं.
दिवाळीला 27 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वाजता जग्गा दारु पित होता. त्याने श्रवणलाही तिथं बोलवून घेतलं. त्यानंतर श्रवणने प्रल्हाद यांना फोन करून दारुच्या अड्ड्यावर बोलवून घेतलं. मला न्यायला या असं प्रल्हाद यांनी सांगितलं.
सही किया! छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना विद्यार्थिनींनीच दिला चोप
श्रवण आणि जग्गा हे प्रल्हाद यांनी आणण्यासाठी पोहोचले. चौपाटीवरून दोघांनीही त्यांना बाइकवरून आणलं. त्यानंतर प्रल्हाद यांना भरपूर दारू पाजली. पुन्हा बोरी बांदरी इथं जग्गाच्या घरी आणून तिथं दारू प्यायले. याच ठिकाणी श्रवणने चाकुचे वार प्रल्हाद यांच्या डोक्यावर केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
धक्कादायक ! मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना उतरवायला लावले कपडे