Home /News /national /

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने दोन्ही दहशतवाद्यांना मिलेनियम पार्क परिसरातून ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रातून दिल्लीत मोठ्या घातपात घडवण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : देशाची राजधानी नवी दिल्लीत (Delhi) दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना (Delhi Police) यश आले आहे. खतरनाक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या ( Jaish-e-Mohammed ) 2 दहशतवाद्यांना अटक (terrorists arrested) करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रातून दिल्लीत मोठ्या घातपात घडवण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेलने अटक केली आहे. अब्दुल लतीफ आणि अशरफ खटाना अशी त्यांची नावं आहे. दोघेही काश्मीरमधील बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातील राहणारे आहे. 6 वर्षांच्या चिमुरडीवर केला सामूहिक बलात्कार, नरबळीसाठी नराधमांनी काढली फुफ्फुसं मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन्ही दहशतवाद्यांना  मिलेनियम पार्क परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांकडून ऑटोमेटिक पिस्टल आणि 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या दोघांकडून काही कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आली आहे. यात दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी घातपात घडवण्याचा कट होता. या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मित्राने साखरपुड्याला बोलावले अन् दारू पाजून केला सामूहिक बलात्कार,मुंबईतील घटना याआधीही ऑगस्ट महिन्यात दिल्लीतील  धौलाकुआं भागात एन्काऊंटरमध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं त्याचे नाव आहे. अबू युसूफचा दहशतवादी संघटना आयसीसशी संबंध होता. त्याच्याकडून दोन IED आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या