काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्याला सोनिया गांधींनी दिली मोठी जबाबदारी

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्याला सोनिया गांधींनी दिली मोठी जबाबदारी

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. आता एचके पाटील महाराष्ट्राच्या प्रभारी पदी असणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 11 सप्टेंबर: काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकारणीची फेररचना करण्यात आली आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, आंबिका सोनी, आनंद शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले बिहारचे नेते तारिक अन्वर यांना महासचिव पद देण्यात आलं असून सोनिया गांधी यांनी मोठी जबाबदारी दिली आहे.

अन्वर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराज होऊन पक्ष सोडला होता. अन्वर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर सोनिया गांधींना पत्र लिहून वादळ निर्माण करणारे गुलाम नवी आझाद यांना महासचिव पदावरून हटवण्यात आलं आहे. ते काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य आणि राज्यसभेत पक्षाचे नेते असतील.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. आता एचके पाटील महाराष्ट्राच्या प्रभारी पदी असणार आहेत.

रणदीप सिंह सुरजेवाला यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. त्यांना कर्नाटकचं प्रभारी बनविण्यात आलं आहे. त्याचबरोबर कार्यकारीणतही स्थान देण्यात आलं आहे.  त्याच बरोबर कांग्रेस अध्यक्षांना मदत करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पत्र लिहिणारे जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगालचे प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातले नेते मुकूल वासनिक यांना मध्य प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे.

काँग्रेस कार्यकारणीत यावेळी पहिल्यांदाच गांधी कुटुंबातल्या तीन सदस्यांचा समावेश आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे यांचा समावेश आहे.

त्या पत्रावर स्वाक्षरी असलेले आनंद शर्मा आणि मनीष तिवारी यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नाही. लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना पश्चिम बंगालचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 11, 2020, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading