मराठी बातम्या /बातम्या /देश /पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान, गोळीबार सुरूच

पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान, गोळीबार सुरूच

File Photo

File Photo

Terror Attack in Pulwama: जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पुलवामाच्या (Pulwama) काकापोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे.

श्रीनगर, 02 एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पुलवामाच्या (Pulwama) काकापोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाने तीन आंतकवाद्यांना घेराव घातला असून त्यापैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान (terrorist shot dead) घालण्यात यश आलं आहे. या भागात अजूनही दोन दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. सकाळची वेळ असल्याने लोकांना घराचे दरवाजे व खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन लष्कराकडून केलं जात आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद (Internet Shut Down) केली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा परिसरातील समबोरा गावात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. गुप्त माहितीनंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम सुरू केली असता, पकडल्या जाण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान दहशतवाद्यांना शरण येण्यासही सांगितलं गेलं. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. यानंतर भारतीय सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आहे.

आतापर्यंत या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे, तर दोन दहशतवादी सतत गोळीबार करत आहेत. गेल्या काही काळापासून सतत होणाऱ्या गोळीबारावरून असा अंदाज लावला जात आहे, की संबंधित दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात गोळ्या उपलब्ध आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. यामध्ये भारतीय लष्कराची कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे ही वाचा- पाकिस्तानला धडकी भरवणारा VIDEO, भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या 10 चौक्या

पुलवामाप्रमाणे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट

एका अहवालानुसार, दहशतवादी पुलवामा याठिकाणी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी लागणारी स्फोटके आणि दारुगोळा पीओकेमधून काश्मीरमध्ये आणला जात आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत 50 किलोहून अधिक स्फोटकं श्रीनगरला आणली जाणार आहेत. ज्यामध्ये आरडीएक्स आणि इतरही काही स्फोटकांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर, गुप्तचर अहवालानुसार आतापर्यंत 10 किलोपेक्षा जास्त वजनाची स्फोटकं केरन सेक्टरमध्ये आणण्यात आली आहेत. ही सर्व स्फोटकं सीमा रेषेजवळची अज्ञात ठिकाणी लपण्यात आली आहेत.

First published:

Tags: Indian army