मेजर गोगोईंविरोधातील कोर्ट मार्शल पूर्ण, होणार ही शिक्षा

मेजर गोगोई यांच्याविरोधातील कोर्ट मार्शल अखेर पूर्ण झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 07:37 PM IST

मेजर गोगोईंविरोधातील कोर्ट मार्शल पूर्ण, होणार ही शिक्षा

नवी दिल्ली, 31 मार्च : जम्मू-काश्मीरमधील तरूणाला जीपसमोर बांधून आणलेल्या मेजर गोगोईंविरोधातील कोर्ट मार्शल अखेर पूर्ण झालं आहे. स्थानिक महिलेशी केलेली मैत्री आणि त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याशी झालेला वाद यावरून मेजर लीतूर गोगोई वादात सापडले होते. त्यानंतर लष्करानं त्यांच्याविरोधात कारवाई करत कोर्ट मार्शल केलं होतं. अखेर त्यांचं कोर्ट मार्शल पूर्ण झालं असून त्यांना शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.

फेब्रुवारीमध्ये मेजर गोगोई आणि आणि त्यांच्या ड्रायव्हरविरोधात पुरावे एकत्र करण्यात आले. त्यानंतर कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पदावर गदा येऊ शकते. त्यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे लष्कराच्या कारवाईकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


कसं होतं कोर्ट मार्शल?

लष्करातील व्यक्तिविरोधात कोर्ट मार्शल केलं जातं. यामध्ये जवळपास 70 अपराधांचा समावेश असून दोषी आढळल्यास शिक्षा केली जाते. सर्व देशांमध्ये कोर्ट मार्शलची पद्धत सारखीच आहे. लष्करातील व्यक्तिनं नियमांचं उल्लंघन केलं आहे का? त्यामध्ये व्यक्ती दोषी आढळते का? या साऱ्या बाबींचा विचार यामध्ये केला जातो. युद्ध कैद्यांसाठी देखील कोर्ट मार्शल केलं जातं.

Loading...

जनरल कोर्ट मार्शल, डिस्ट्रीक्ट कोर्ट मार्शल, समरी जनरल कोर्ट मार्शल आणि समरी कोर्ट मार्शल असे कोर्ट मार्शलचे प्रकार आहेत. बलात्कार, हत्या, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि लष्करी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर कोर्ट मार्शल केलं जातं.


दोषीला कोणत्या सजा होऊ शकतात?

कोर्ट मार्शलमध्ये दोषी आढळल्यास फाशी, जन्मठेप सारख्या सजा देखील होऊ शकतात. तसेच नोकरीवरून काढून टाकणे, पद उन्नती रोखणे, पगार आणि पेन्शन थांबवणे तसेच लष्करातील व्यक्तीला दंड देखील होऊ शकतो.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...