शहीद केतन शर्मा यांनी कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता 'हा' शेवटचा मेसेज

शहीद केतन शर्मा यांनी कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता 'हा' शेवटचा मेसेज

अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा यांना वीरमरण आलं.

  • Share this:

श्रीनगर, 19 जून : अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा यांना वीरमरण आलं. ही चकमक उडण्यापूर्वी मेजर शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोटोसह एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला होता. त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं की,'कदाचित हा माझा शेवटचा फोटो असू शकतो'. कुटुंबीयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मेजर शर्मा यांनी हा मेसेज शेअर केल्यानंतर काही तासांतच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा शहीद झाल्याचे वृत्त समोर आले.

चुलत भावानं दिली 'ही' माहिती

केतन शर्मा यांचे चुलत भाऊ अनिल शर्मा यांनी सांगितलं की," जेव्हा केतन शर्मा यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज केला तेव्हा त्यांच्या पत्नीनं त्यास रिप्लाय दिला होता. पण ते सुरक्षितरित्या परत येतील,अशी आम्हाला आशा होती. पण बराच वेळ उलटल्यानंतरही त्यांचा रिप्लाय आला नाही. यादरम्यान, दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सैन्याचे अधिकारी घरी आणि शर्मा यांनी वीरमरण आल्याची माहिती आम्हाला दिली.

प्रत्येक दिवशी फोन करायचे केतन

केतन यांचे वडील रविंदर शर्मा यांनी सांगितलं की, 'केतन घरी प्रत्येक दिवशी घरी फोन करायचा. त्याच्या आईची प्रकृती ठीक नसल्या कारणामुळे तो विचारपूस करण्यासाठी नेहमी फोनवरून संपर्क साधायचा'.

अनंतनाग चकमक, मेजर शर्मा शहीद

अनंतनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सोमवारी (17 जून) पहाटे मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत मेजर केतन शर्मा शहीद झाले.

शिवसेना आमदार-मुख्यमंत्री फडणवीस आमनेसामने, पाहा VIDEO

First published: June 19, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading