मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मू-काश्मीर: माता वैष्णोदेवी भवनाजवळ भीषण आग; धुराचे लोट 10 ते 15 फुटांपर्यंत, पाहा VIDEO

जम्मू-काश्मीर: माता वैष्णोदेवी भवनाजवळ भीषण आग; धुराचे लोट 10 ते 15 फुटांपर्यंत, पाहा VIDEO

Fire near Mata Vaishno Devi Bhawan: माता वैष्णौदेवी भवनाजवळ भीषण आग लागली आहे.

Fire near Mata Vaishno Devi Bhawan: माता वैष्णौदेवी भवनाजवळ भीषण आग लागली आहे.

Fire near Mata Vaishno Devi Bhawan: माता वैष्णौदेवी भवनाजवळ भीषण आग लागली आहे.

  • Published by:  Sunil Desale

Jaजम्मू काश्मीर, 8 जून: कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या माता वैष्णौदेवी मंदिराचे भवन (Mata Vaishno Devi Bhawan) असलेल्या परिसरात भीषण आग (Major Fire) लागली आहे. कालिका भवन (Kalika Bhawan) जवळील दोन नंबरच्या काऊंटरवर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हे जवळपास दोन ते तीन किलोमीटर दूर वरून दिसत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुळशी दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप, "मुळशी तालुक्याची रग दाखवा, कंपन्यांत घुसून पाहणी करणार"

पाहता पाहता अवघ्या काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं. मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केलं. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हीआयपी गेट जवळ असलेल्या काऊंटिंग रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 80 टक्के आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

First published:

Tags: Fire, Jammu kashmir