कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग.. एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू

कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग.. एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या.

  • Share this:

सुरत, 24 मे- सुरत शहरात शुक्रवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरु होता. याच मजल्यावर आग भडकली. यावेळी क्लासमध्ये 30 हून जास्त विद्यार्थी- विद्यार्थिंनी उपस्थित होते. आग सर्वत्र झपाट्याने पसरली. विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग सापडला नाही. बहुतेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली उ़ड्या घेतल्या. या दरम्यान, धूरामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.

तब्बल एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना आले आहे.  घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश..

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत नागरिकांच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेत मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला सर्व सहकार्य करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

स्‍थानिक नागरिकांनी सांगितले की,  तक्षशिला कॉम्प्लेक्सला आग लागल्याची माहिती फायर स्टेशनला देण्यात आली आहे. परंतु फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी पोहोचलेले नाहीत. आगीने आणखी रौद्ररुप धारण केले आहे. स्‍थानिकांनी विद्यार्थ्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला आहे.


पाहा...सुरतमध्ये अग्नितांडवाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या