बापरे! तेलाच्या विहिरीजवळ मोठा स्फोट; 3 परदेशी तज्ज्ञ जखमी, 9 जूनलाही येथेच झाला होता भडका

बापरे! तेलाच्या विहिरीजवळ मोठा स्फोट; 3 परदेशी तज्ज्ञ जखमी, 9 जूनलाही येथेच झाला होता भडका

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगीत जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे सांगितले.

  • Share this:

गुवाहाटी, 22 जुलै : आसामच्या ऑइल इंडिया लिमिटेडच्या विहिरीत बुधवारी पुन्हा एकदा स्फोट झाला. गेल्या महिन्यात 9 जून रोजी येथेच गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तब्बल सव्वा महिन्यांपुन्हा येथे अपघात झाला आहे.

या स्फोटात 3 तज्ज्ञ जखमी झाले आहेत. तिनसुकिया जिल्ह्यात बागजानमध्ये विहीर क्रमांक 5 जवळ आग लागली आहे. विहिरीत स्फोट झाल्यानंतर संपूर्ण भागात प्रवेश बंदी करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे वाचा-'आम्ही कायबी करीन, आमचं दूध हाय' शेतकऱ्याच्या लेकाने केली दुधाने अंघोळ, VIDEO

वृत्त संस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार – आग विझविणारे बीओपी लावण्यापूर्वी विहीर उघडण्यात येणार होती, त्याच दरन्यान आग लागली. स्फोट झाल्यानंतर आग विझविण्याचं ऑपरेशन थांबविण्यात आलं आहे.

27 मेपासून लागली आहे आग

बागजानमध्ये एक महिना पूर्वीपासून आग लागली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडच्या एका विहिरीतून 27 मे 2020 रोजी नैसर्गिक वायू गळती होत होती. याकारणाने स्फोट झाला ज्यात 9 जून रोजी विहिरीला आग लागली होती. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगीत जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे सांगितले.सातत्याने सुरू असलेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या गावातील 9000 हून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या