सुन्नी वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय; अयोध्येच्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार

सुन्नी वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय; अयोध्येच्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार

जनतेच्या सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या या वास्तूच्या पायाभरणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्यात येणार आहे.

  • Share this:

लखनऊ, 8 ऑगस्ट :  उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड (Sunni Central Waqf Board) द्वारा अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाला मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणाऱ्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की उच्चतम न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला मिळालेल्या 5 एकर जमिनीवर रुग्णालय, लायब्ररी, सामुदायिक स्वयंपाकघर आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील. राज्याचा मुख्यमंत्री हा जनतेसाठी काम करीत असतो. यानुसार या वास्तूच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित देण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री या कार्यक्रमात केवळ सहभागीच होणार नाही तर यासाठी सहयोगही करतील.

हे वाचा-VIDEO: संतापजनक! उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला सिक्युरिटी गार्डची बेदम मारहाण

बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्त माध्यमाशी बोलताना याबाबत वक्तव्य केलं होतं, अयोध्येतील मंदिराच्या शिलान्यासानंतर सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीवर मशिदीच्या शिलान्यासाठी जाणार का याबाबत पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला होता. यावर मला बोलवणार नाही म्हणून मी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. राममंदिराची उभारणी करण्यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथे लोकोपयोगी वास्तू उभारण्याबाबत प्रतिक्रिया दिली जात होती.

Published by: Meenal Gangurde
First published: August 8, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading