शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; वाचा ट्रेन्सचे नवीन मार्ग

शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; वाचा ट्रेन्सचे नवीन मार्ग

भारतीय रेल्वे (Indian Rail) या मार्गावरील काही ट्रेन्स (Trains) रद्द तर काही ट्रेन्सचे मार्ग (Route) बदलत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जानेवारी :  उत्तर भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Agitation) पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वे (Indian Rail) या मार्गावरील काही ट्रेन्स (Trains) रद्द तर काही ट्रेन्सचे मार्ग (Route) बदलत आहे. यानुसार पुन्हा भारतीय रेल्वेने काही ट्रेन्स रद्द केल्याची तसेच काहींचा मार्ग बदलण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी आरक्षण केलं असेल तर त्याचे स्टेटस तपासणे गरजेचे आहे. प्रवासासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घेऊया कोणत्या ट्रेन्स रद्द केल्या आहेत तर कोणत्या ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

4 जानेवारीला धावणारी ट्रेन क्रमांक 09613 अजमेर- अमृतसर एक्सप्रेस विशेष ट्रेन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 5 जानेवारीची 09612 अमृतसर-अजमेर एक्सप्रेस विशेष ट्रेन देखील रद्द करण्यात आली आहे.

4 जानेवारीला धावणारी ट्रेन क्रमांक 05211 दरभंगा-अमृतसर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेन क्रमांक 05612 अमृतसर-दरभंगा एक्सप्रेस विशेष ट्रेन 6 जानेवारीला धावणार नाही.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या ट्रेन्स

1 ट्रेन क्रमांक ०२७१५ नांदेड – अमृतसर एक्सप्रेस 4 जानेवारीला नवी दिल्लीपर्यंत जाईल. त्यामुळे ट्रेन क्रमांक अमृतसर- नांदेड एक्सप्रेस 6 जानेवारीला नवी दिल्लीवरुनच सुटेल.

2 ट्रेन क्रमांक 09025 बांद्रा टर्मिनस- अमृतसर एक्सप्रेस 4 जानेवारीला चंदीगडपर्यंतच जाईल. त्यामुळे ट्रेन क्रमांक 06026 अमृतसर – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस 6 जानेवारील चंदीगडमधूनच सुटेल. चंदीगड-अमृतसर-चंदीगड या मार्गावर ही एक्सप्रेस धावणार नाही.

मार्ग बदलण्यात आलेल्या ट्रेन्सची यादी

-    ट्रेन क्रमांक ०२९०३ मुंबई सेंट्रल-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ३ जानेवारीला बियास-तरतरन-अमृतसर या मार्गावरुन धावेल.

-    ट्रेन क्रमांक ०२९०४ अमृतसर- मुंबई सेंट्रल एक्सप्रेस स्पेशल ४ जानेवारीला अमृतसर-तरतरन-बियास या मार्गावरुन धावेल.

-    ट्रेन क्रमांक ०२९२५ बांद्रा टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ४ जानेवारीला बियास-तरतरन-अमृतसर या मार्गे धावेल.

-    ट्रेन क्रमांक ०२९२६ अमृतसर –बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस स्पेशल ४ जानेवारीला अमृतसर-तरतरन-बियास या मार्गे धावेल.

-    ट्रेन क्रमांक ०४६५० अमृतसर-जयनगर एक्सप्रेस स्पेशल ४ जानेवारीला अमृतसर-तरतरन- बियास या मार्गे धावेल.

-    ट्रेन क्रमांक ०२०२६ अमृतसर-नागपूर एक्सप्रेस स्पेशल ४ जानेवारीला अमृतसर-बियास मार्गे धावेल.

Published by: Manoj Khandekar
First published: January 5, 2021, 6:27 PM IST

ताज्या बातम्या