मराठी बातम्या /बातम्या /देश /MP Bus Accident: बस कोसळली कालव्यात, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू

MP Bus Accident: बस कोसळली कालव्यात, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या सीधी येथेप्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशच्या सीधी येथेप्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशच्या सीधी येथेप्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, अपघातात 40 जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघात रामपूरच्या नैकिन परिसरात सकाळी साडेसातच्या आसपास झाला आहे.

ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. सतना शहराकडे जात असताना बसला अपघात झाला. मार्गातच असलेलया नैकिनजवळ बस एका कालव्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सीधीमधील अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आणि बचावकार्य जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.

SDRF कडून बचावकार्य सुरू -

SDRF च्या टीमनं बचावकार्य सुरू केलं आहे. याठिकाणी क्रेनसह अन्य मशीनरीही बोलावल्या गेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी थांबविण्यात आले आहे. कालव्यातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी त्याचं पाणी सिहावल कालव्यात पाठविलं जात आहे. आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Rescue operation