मराठी बातम्या /बातम्या /देश /

बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळला, 11 जण जखमी

बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळला, 11 जण जखमी

अपघातावेळी 17 मजूर तेथे काम करत होते. अचानक फ्लायओव्हरचा एक भाग कोसळला आणि एकच खळबळ उडाली. यात एका इंजिनियरसह 11 मजूर जखमी झाले.

  • Published by:  Karishma Bhurke

कोटा, 10 डिसेंबर : बुधवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरचा (Flyover) स्पान पडून मोठी दुर्घटना (Big accident) घडली. या दुर्घटनेत तेथे काम करणारे 11 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत कोसळलेल्या स्पानच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याच्या शक्यतेमुळे रात्री उशिरापर्यंत एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) सुरू होतं.

कोटामधील झालावाडा रोड येथे एका उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू असताना रात्री 9च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातावेळी 17 मजूर तेथे काम करत होते. अचानक फ्लायओव्हरचा एक भाग कोसळला आणि एकच खळबळ उडाली. यात एका इंजिनियरसह 11 मजूर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि प्रशासनाची अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं.

(वाचा - मोदी सरकारला घाबरला पाकिस्तान! पुन्हा Surgical Strike ची भीती, 'हे' दिलं कारण)

फ्लायओव्हरच्या कोसळलेल्या भागाखाली काही मजूर अडकले असल्याच्या भीतीने रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी या प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.

(वाचा - Apple चे जनक स्टीव्ह जॉब्स यांच्या लेकीची मॉडेलिंगमध्ये एंट्री; शेअर केले PHOTO)

तसंच फ्लायओव्हरचं बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

First published: