S M L

शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारलं 'दहशतवाद्यांचे काय झाले?'

ते दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. तब्बल चार दिवसांनतर शुध्दीवर येताच त्यांनी 'दहशतवाद्यांचे काय झाले? हा प्रश्न विचारला.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 14, 2018 08:31 AM IST

शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारलं 'दहशतवाद्यांचे काय झाले?'

14 फेब्रुवारी : सैन्यात भरती होण्यासाठी देशप्रेमाबरोबरच जिगर लागतं असं आपण कायम म्हणतो. आपल्या देशाविषयीचं असं अनोख प्रेम आणि जिगर दाखवून दिली आहे मेजर अभिजीत यांनी. ते दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. तब्बल चार दिवसांनतर शुध्दीवर येताच त्यांनी 'दहशतवाद्यांचे काय झाले? हा प्रश्न विचारला. त्यांच्या या पहिल्या प्रश्नानेच सगळे अवाक झाले. या बहाद्दुराच्या साहसाचे कौतुक करावे तेवढे कमीचं आहे.

एखादा बेशुध्द व्यक्ती शुध्दीवर आला की आपल्या नातेवाईकांबदद्ल चौकशी करतो. पण अभिजित यांनी देशालाच सर्वस्व मानल्याने शुध्दीत येताच त्यांनी दहशतवाद्यांबद्दल विचारपूस केली. बरं इतकंच नाही तर पाकिस्तानसोबत पुन्हा मुकाबला करण्यासाठी मी सज्ज असल्याचंही ते म्हणाले. यामुळे आपल्या नसानसात देशप्रेमच भिनल्याचे अभिजीत यांनी दाखवून दिल आहे.

जम्मू-कश्मीरमधल्या सुंजवान इथल्या लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उधमपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिजीत यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं त्यांच्या वरिष्टांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सुंजवानमधल्या भारतीय लष्करी तळावरच्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं आहे. दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे पुरावे नेटवर्क१८ च्या हाती लागलेत. पाकिस्तानी ऑर्डिनन्स कॉर्पचा अधिकारी नबील उर्फ साकिब, पाकिस्तानी लष्करातल्या एसएसजीचा अधिकारी असिफ अली आणि अब्दुर रझाक, लेफ्टनंट अतिक अवान, कॅप्टन उसामा यांचा यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close