Majerhat Bridge Collapse : कोलकात्यात पूल कोसळला, एकाचा मृत्यू

Majerhat Bridge Collapse : कोलकात्यात पूल कोसळला, एकाचा मृत्यू

  • Share this:

कोलकाता, 04 सप्टेंबर : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक पुल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडलीये. शहरातील माझेरहाट भागात हा पूल कोसळलाय. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर पुलाच्या ढिगाऱ्याखाली एक बस आणि अनेक लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. राज्यमंत्री फरहद हकीम यांनी माहिती सांगितलं की, पुलाच्या ढिगाराखाली अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलंय. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. ही दुर्घटना का घडली याचीही माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहे.

8 जखमींना जवळीस एसएसकेएम मेडिकल काॅलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दुर्घटनेनंतर तारातला आणि डायमंड हार्बर मार्ग बंद करण्यात आलाय. तसंच

सियालदाहला जोडणारा रेल्वे मार्गही बंद करण्यात आलाय.

दुर्घटनेस्थळी मदतकार्य सुरू आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. सध्या बचावकार्यावर भर दिलाय अशी माहितीही ममता बॅनर्जी यांनी दिली.

==============================================

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

First published: September 4, 2018, 6:57 PM IST

ताज्या बातम्या