#MainBhiChowkidar ट्विटरवर जगभरात नंबर वन! 'चौकीदार चोर है' वर मोदींचा ट्विटर स्टाईक

#MainBhiChowkidar ट्विटरवर जगभरात नंबर वन! 'चौकीदार चोर है' वर मोदींचा ट्विटर स्टाईक

पंतप्रधानांच्या या ट्वीटला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद लाभला आणि काही तासांत #MainBhiChowkidar हॅशटॅग वर्ल्ड ट्रेंडिंगमध्ये नंबर एकला पोहोचला.

  • Share this:

मुंबई, 16 मार्च : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना काही दिवस उरले असताना भाजपच्या सोशल मीडिया सेल्सच्या चँपिअन्सनी एक नामी युक्ती लढवली आहे. स्वतः नरेंद्र मोदींनीच विरोधकांच्या टीकेचा सकारात्मक पद्धतीनं वापर करत विरोधी पक्ष नेत्यांवरच दमदार स्ट्राईक केला आहे. मोदींवर टीका करताना विरोधकांनी 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं. याचाच वापर करत नरेंद्र मोदींनी नवं प्रचारतंत्र सुरु केलं आणि गंमत म्हणजे या प्रचारतंत्राचा एक भाग असलेला हॅशटॅग काही तासातच  वर्ल्ड नंबर वन झाला.

नरेंद्र मोदींनी शनिवारी सकाळी एक पोस्ट करत #MainBhiChowkidar असा हॅशटॅग वापरला.  काही वेळातच हा हॅशटॅग जागतिक स्तरावर ट्विटरचा नंबर वन ट्रेंड बनला.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तुमचा चौकीदार खंबीरपणे उभा राहून देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही देशातील भ्रष्टाचार आणि सामाजिक कुप्रवृत्तींविरोधात लढत असलेला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणेल- #MainBhiChowkidar असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

या ट्वीटमधून मोदींनी देशवासीयांना एकत्र येत या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या या ट्वीटला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. हे ट्वीट आतापर्यंत जवळपास 63000 पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे तर 24000 हून अधिक लोकांनी मोदींच्या या ट्वीटला रिट्वीट केलं आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी हा प्रचाराचा एक भाग असल्याचं म्हणत त्यांच्या ट्वीटमध्ये #MainBhiChowkidar चा वापर केल्यामुळे हा हॅशटॅग ट्रेंडीगमध्ये आला. तसंच भाजपावर टीका करताना काँग्रेसनंही #ChorHiChowkidar असा हॅशटॅग वापरायला सुरुवात केली आहे.

याशिवाय राहुल गांधींनीही मोदी आणि भाजप सरकारवर ट्वीटरवरुन टीका केली आहे.

पाहा : VIDEO: मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा

First published: March 16, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading