Home /News /national /

'हल्दीराम भुजियावाला'चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन, पत्नी व मुलगी सिंगापूरमध्ये अडकली

'हल्दीराम भुजियावाला'चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन, पत्नी व मुलगी सिंगापूरमध्ये अडकली

अग्रवाल यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी आपल्या वडिलांसोबत सिंगापूरमध्ये होत्या.

    नवी दिल्ली, 06 एप्रिल : 'हल्दीराम भुजियावाला'चे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी रात्री सिंगापूरमध्ये निधन झाले. ते यकृत रोगाने ग्रस्त होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अग्रवाल यांचा 57 व्या वाढदिवसाच्या एका दिवसाआधी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यामुळे उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सध्याची देशातील परिस्थिती पाहता सिंगापूरमध्ये त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महेश अग्रवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सिंगापूरमध्ये महेश अग्रवाल यांच्यावर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार करणं शक्य झालं नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. मृत्यूचं केंद्र बनतंय हे रुग्णालय! एकाच खोलीत 40 मिनिटांत 10 रुग्णांचा मृत्यू अग्रवाल यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी आपल्या वडिलांसोबत सिंगापूरमध्ये होत्या. पण अग्रवाल यांच्या जाण्यानंतर त्यांना भारतात येण्याची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही. तथापि, दोघांनीही भारतीय दूतावासात भारतात परत जाण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यांच्या घरी परत जाण्याची विनंती केली होती. सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूने ग्रस्त आहे. संसर्ग टाळण्यासाठी, सर्व बाधित देशांनी त्यांची आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. लॉकडाउनची परिस्थिती भारतासह जवळजवळ सर्वच देशांमध्ये आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉकडाउनची घोषणा केली असून ती 14 एप्रिल रोजी संपणार आहे. निर्धारित वेळानंतरही भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार की नाही यावर काहीच स्पष्ट नाही. मराठी पंतप्रधानांची कमाल, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी लिओ वराडकर पुन्हा डॉक्टर हल्दीरामच्या यशाची कहानी प्रत्येक यशाच्या मागे बरेच कष्ट असतात आणि प्रत्येक यशस्वी व्यवसायाच्या मागे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे विशेष योगदान असते. कोणत्याही मोठ्या कंपनीची सुरुवात अगदी लहान स्तरावर सुरू होते आणि कुटुंबातील फक्त एक व्यक्ती आगामी पिढ्यांना विशेष वारसा देण्यास पुढे जाते. अशीच यशाची कहानी आहे भारतातील प्रसिद्ध फूड कंपनी 'हल्दीराम'ची. हल्दीरामची भुजियान शेव, हल्दीराम सोहन पापडी आणि इतर अनेक प्रकारचे स्नॅक्स या कंपनीमध्ये बनवले जातात. पण सुरुवातीपासूनच हा इतका प्रसिद्ध ब्रँड नव्हता, तर ते बीकानेर या छोट्या व्यावसायिकाने सुरु केलेलं एक लहान दुकान होतं. जिने आज कुटुंबातील सदस्यांच्या मेहनतीचेच रुपांतर स्वतःच करोड्यांच्या व्यवसायात केलं. भारतात कोरोनाचा कहर! 24 तासांत 32 जणांचा मृत्यू, रुग्णाची संख्या 4 हजार पार कंपनीची स्थापना केली, परंतु इतर बर्‍याच लोकांना रोजगार देखील दिला. कंपनीला प्राधान्य दिलं. अपार कष्ट केले. उत्तम चवीतून लोकांची मनं जिंकली आणि आज या कंपनीचे पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरी असतात. पण याच कंपनीला उभं करणारा मालक आज हे जग सोडून केल्यामुळे व्यावसाय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या