S M L

महात्मा, सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना 'भारतरत्न'? मोदींची 'सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी

'काँग्रेसच्या काळात गांधी घराणे आणि नेहरूंशीवाय इतर कुठल्याही नेत्यांना काँग्रेसने महत्त्व दिलं नाही.'

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 05:20 PM IST

महात्मा, सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना 'भारतरत्न'? मोदींची 'सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी

नवी दिल्ली 10 जानेवारी : लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने मोदी सरकार आणखी एका राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी करत आहे. खुल्या वर्गातल्या गरिबांना 10  टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या तंबूत आधीच खळबळ उडाली आहे.


त्या धक्क्यातून ते सावरले नसतानाच सरकार दुसरा महत्त्वाचा निर्णय  घेण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय असेल भारतरत्न पुरस्कारांची घोषणा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न देण्याची घोषणा सरकारकडून होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारीच्या दरम्यान ही मोठी घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने निर्णय घेण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालीही सुरू झाल्याचही सूत्रांनी सांगितलं. फुले दाम्पत्य आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी संसदेतही अनेक पक्षांच्या खासदरांनी केली होती.


Loading...

तसच विविध सामाजिक संघटनांनीही ही मागणी केली होती. हा निर्णय घेतला तर दलित आणि ओबीसींमध्ये चांगला संदेश जाईल अशी शक्यत आहे. काँग्रेसच्या काळात गांधी आणि नेहरूंशीवाय इतर कुठल्याही नेत्यांना काँग्रेसने महत्त्व दिलं नाही असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जातो.


सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पेटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या स्मारकांसाठी सरकाने अनेक निर्णय तातडीने घेतले. त्याला जोडूनच आता भारतरत्नचा निर्णयही होऊ शकते अशी शक्यता आहे. 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

'मित्रों...' भुजबळांकडून मोदींच्या मिमिक्रीनंतर तुफान हशा, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 05:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close