महात्मा गांधी चतुर बनिया था, काँग्रेसला झोडपण्याच्या नादात अमित शहांची जीभ घसरली

महात्मा गांधी चतुर बनिया था, काँग्रेसला झोडपण्याच्या नादात अमित शहांची जीभ घसरली

  • Share this:

10 जून : काँग्रेसवर टीका करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चतुर बनिया असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस हा तत्वांवर चालणार पक्ष नाही फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा गांधी चतुर व्यापारी होते ( वो बहुत चतुर बनिया था ) त्यांना काँग्रेसच्या अंधकारमय भविष्याची कल्पना होती. म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता, असं अमित शहा म्हणालेचत.

छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत 65 जागांचं लक्ष्य गाठण्यासाठी रायपूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याबाबत फारसा आक्षेप असण्याचं कारण नाही, पण गांधीजींच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप मात्र नक्की होऊ शकतो.

काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला पक्ष नाही. स्वातंत्र्य मिळवणे हे एक साधन होते आणि महात्मा गांधी हे एक 'चतुर बनिया' होते. महात्मा गांधींना माहित होते की पुढे काय होणार आहे. म्हणूनच महत्मा गांधींनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला विसर्जित करायला हवे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

अमित शहा हे तीन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. 2018 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 90 जागांवर लक्ष्य ठेऊन जवळपास 65 जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 03:38 PM IST

ताज्या बातम्या